अवकाळीचा दणका, शेतकऱ्यांना फटका! ‘या’ जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान, भरपाई देण्याची सरकारकडे मागणी .

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. कारण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: फळबागांसह भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यात कुठं कुठं शेती पिकांचं नुकसान झालं आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. नंदुरबार जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ बागांना फटका बसला आहे. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ गावात झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे 3 एकर टरबुज पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने लावलेल्या तीन एकर टरबूज जमीनदोस्त झालं आहे. पिकासाठी झालेला दीड ते 2 लाखांचा खर्च गेला वाया गेला आहे. नुकसान झाल्याने 5 लाखांचे कर्ज फेडू कसा असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अचानक येत असलेला पाऊण आणि वादळी वाऱ्यामुळे केळी ची पाने फाटत असल्याने त्याचा परिणाम थेट उत्पन्नावर होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे हजारो रुपये खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या या बागेतून खर्च निघणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय.बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने 5 ते 13 मे या कालावधीत 18 हेक्टर वरील शेतीपिकांचे नुकसान झाले. तर तिघांचा वीज पडून मृत्यू आणि एक जण जखमी झाल्याची नोंद महसूल विभागाकडून करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण 24 गावे अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहेत. यात तीन व्यक्ती मयत तर एक जखमी आहे. दुधाळ जनावरांसह इतर 16 जनावरांचा मृत्यू झाला. पडझड झालेल्या घरांची संख्या एकूण पाच आहे. 18 हेक्टर वरील शेती पिकांचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून सुरू आहेत. बीड तालुक्यातील पिंपळनेर गेवराईतील सिरसदेवी इतर ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात आली. पंचनाम्या नंतर नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागात आज दुपारी अचानक अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पिंपरी चिंचवड शहरात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. त्यात काही ठिकाणी पुढील 24 तासात अवकाळी पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यातच आज दुपारी दोन वाजता दरम्यान सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची चांगली तारंबळ उडाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.