बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं; दहा महिन्यांपूर्वी आईची मायाही हरवली, आता लेकही गेला, सुन्न करणारी कहाणी.

जळगावात एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या डोक्यावरुन त्याच्या वडिलांचं छत्र लहानपणीच हिरावल्या गेलं होतं. तर, काही दिवसांपूर्वी त्याची आई देखील गेली.आई-वडिलांचे छत्र सर्वांना हवेसे वाटणारे असते. घराला घरपण देणारी एक गोष्ट म्हणजे आई -वडील असतात. मात्र, हे सुख सर्वांच्याच नशिबी येते असं नाही. जळगावातील एका तरुणाची ही कहाणी तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल. एका अपघातात अजय चौधरी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची जी कहाणी समोर आली त्याने जळगाव हळहळलं आहे.

अजय चौधरी लहान असतानाच त्याच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. त्याने वडिलांचं प्रेम काय असतं, त्यांचा आधार काय असतो हे अनुभवण्यापूर्वीच नियतीने त्याच्यापासून त्याचे बाबा हिरावून घेतले. त्याला त्याच्या आईनेच सांभाळ करत लहानाचं मोठं केले. आईची तब्येत खालावल्याने दहा महिन्यांपूर्वी त्याच्या आईचाही मृत्यू झाला. त्याच्या दहा महिन्यातच आता अजयनेही जगाचा निरोप घेतला आहे.आई खूप आजारी होती, म्हणून अजयला नोकरी देखील करता आली नाही. तो नेहमी आपल्या आईच्या सेवेसाठी हजर राहायचा. ना तो कुठेही जायचा नाही. मात्र, दहा महिन्यांपूर्वी त्याच्या आईचा मृत्यू झाला.11 मे रोजी अजय आणि त्याचा मित्र गणेश गीते हे दोघेही नाचनखेडा येथून लोहारा येथे मित्रासह दुचाकी वर जायला निघाले होते.

संतोषीमाता मंदिरा जवळील रस्त्यावर खोदलेल्या नालीजवळ त्यांच्या दुचाकीला आज्ञात वाहनाने रात्री आठ वाजेच्या सुमारास कट मारला आणि ते दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात दोघेही जखमी झाल्याने त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र, जळगाव येथे शस्त्रक्रिया करूनही काहीही झालं नाही. अपघाताच्या 24 तासाच्या आत काळाने ही अजयलाही हिरवून घेतलं.बालपणीच अजयचे वडिलांचे छत्र हरपल्याने तो मामा श्रीकृष्ण भिवसने व दगडू भिवसने यांच्या जवळ राहत होता. बारावीनंतर आयटीआय इलेक्ट्रिक डिप्लोमा केलेला होता. मात्र, आईची तब्येत ठीक नसल्याने आईच्या सेवेसाठी अजय नोकरीसाठी कुठे गेला नाही. मात्र, दहा महिन्यांपूर्वी आजारपणामुळे त्याच्या आईचाही मृत्यू झाला. त्यानंतर अजय हा एकटाच परिवारात होता. आता त्याचाही मृत्यू झाला आहे, त्यामुळे नातेवाईकांमध्ये शोकाकूल वातावरण आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.