चिमुरडीच्या आईचे छत्र हरपले, दारुड्या बापाने छळले; मुलीला गाईच्या गोठ्यात बांधले अन् फळांच्या साली खायला…

जन्मताच गतिमंद असलेल्या ५ वर्षीय चिमुकली आपल्या आईच्या मायेला मुकली. त्यानंतर मात्र दारुड्या बापाने चिमुकलीला गोठ्यात बांधून तिचा छळ सुरू केला.जन्मताच गतिमंद असलेल्या ५ वर्षीय चिमुकली आपल्या आईच्या मायेला मुकली. त्यानंतर मात्र दारुड्या बापाने चिमुकलीला गोठ्यात बांधून तिचा छळ सुरू केला. खाण्यासाठी अक्षरशः केळी, टरबुजाच्या साली खायला दिल्या. हा छळ बघून एक मायेचा पाझर फुटल्याने चिमुकलीची नरकयातनेतून सुटका झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकाच्या माध्यमातून सहा महिन्यानंतर मुलीचे पुनर्वसन करण्यात आले आहे.दामिनी पथकाच्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई येथील ५ वर्षीय सानिया (नाव काल्पनिक आहे) गतिमंद आहे. तिच्या आईचे निधन झाले. व्यसनाधीन वडिलांना सानिया डोईजड झाली. यामुळे तिचा नैसर्गिक मृत्यू व्हावा या उद्देशाने निर्दयी वडिलांनी सानियाचा छळ सुरू केला.

यासाठी सानियाला गाईच्या गोठ्यात पायाला बांधून ठेवले. तिला खाण्यासाठी अक्षरशः खाऊन टाकलेल्या केळी, टरबूजच्या साली दिल्या जात होत्या. दरम्यान पैठण येथील हिना या माहेरी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना लहान मुलीचा रडण्याचा आवाज येत होता. हा आवाज कुणाचा आहे याची माहिती घेतली असता सानिया गतिमंद असल्यामुळे वडील तिचा छळ करतात ही माहिती त्यांना समजली.सानियाची अवस्था त्यांना बघवली नाही. त्यांनी तिच्या वडिलांना का छळ करत असे विचारले. यावर तो बाप म्हणाला मग काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला. आतोनात छळ बघून हिना यांना मायेचा पाझर फुटला. मी मुलीला दत्तक घेते, असं सांगून हिना यांनी बाँड करून दत्तक घेतल्याने मुलीची नरकयातनेतून सुटका झाली आहे. मानवी सहवास न लाभल्याने त्या चिमुरडीची शारीरिक आणि बौद्धिक वाढ झाली नाही.

यामुळे सुटकेनंतर हिना यांच्या घरी आलेल्या सनियाच्या वागण्यात मोठा बदल झाला. सानिया घरात कुणालाही मारहाण करत व आदळआपट करत होती. यामुळे हिना यांनी सानियाला हज हाऊसजवळील खालील अहमद यांच्या अनाथाश्रमात नेऊन सोडले. मुलीची अवस्था पाहून खालील यांनी तिच्यावर योग्य ते उपचार केले. मात्र खालीद त्यांच्या आश्रमात फक्त मुलेच असल्यामुळे त्यांनी ही माहिती दामिनी पथकाला दिली.दामिनी पथकाला घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक कांचन मिरधे, अंमलदार निर्मला निंभोरे, लता जाधव सरिता कुंडारे, अंबिका दारुंटे, प्रियंका भिवसने, मनीषा बनसोडे, पूजा जाधव हे सर्व पथक आश्रमात पोहोचले. कायदेशीर बाजू तपासून दामिनी पथकाने सानिया हिचे पुनर्वसन केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.