आमचे ‘हे’ अभय-बादलसोबत होते; कोंढव्यातील ‘बॉडी’चं गूढ उकललं, चोविशीतील दोन तरुण अटकेत, धक्कादायक कारण समोर.

मृत सुभाष परदेशी यांनी आजारपणाच्या कारणावरून आरोपींकडून 5 लाख रुपये उसनवारी घेतले होते, मात्र ते पैसे परत न दिल्याने रागाच्या भरात डोक्यात दगड मारून त्याचा खून करण्यात आला.आजारपणाच्या नावाखाली हातउसने घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना कोंढवा परिसरात घडली. खून करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींच्या मुसक्या कोंढवा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आवळल्या.दि. 11 मे 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता कोंढवा पोलिसांना माहिती मिळाली की, ज्योती हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत एक इसम रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेला आहे. तत्काळ घटनास्थळी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रऊफ शेख, नवनाथ जगताप, सहा. पो. नि. राकेश जाधव आणि तपास पथक रवाना झाले.

घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता, एका इसमाच्या डोक्यात दगडाने मारून खून केल्याचे निदर्शनास आले. मृत व्यक्तीच्या कपड्यांची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशातून ओळखपत्र मिळाले. त्यावरून त्याची ओळख सुभाष रघुवीर परदेशी (वय 54, रा. गोकुळनगर, कोंढवा बु.) अशी पटली.पोलिसांनी मृताच्या पत्नीशी संपर्क साधला असता, सुभाष हे रात्री त्यांचे मित्र अभय कदम आणि बादल शेरकर यांच्यासोबत गेले असल्याची माहिती मिळाली. तपास अधिक गतिमान करत पोलिस अंमलदार विशाल मेमाणे यांना बातमी मिळाली की दोन्ही आरोपी उत्तमनगर, अहीरेगेट परिसरात लपून बसले आहेत.पोलिसांनी सापळा रचून आरोपी अभय जगन्नाथ कदम, वय 24, रा. तालीम चौक, कोंढवा खुर्द आणि बादल शाम शेरकर (वय 24, रा. बधे चाळ, कोंढवा खुर्द) यांना ताब्यात घेतले.

सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांनी दिलेल्या कबुलीनुसार, मृत सुभाष परदेशी यांनी आजारपणाच्या कारणावरून आरोपींकडून 5 लाख रुपये उसनवारी घेतले होते, मात्र ते पैसे परत न दिल्याने रागाच्या भरात डोक्यात दगड मारून त्याचा खून करण्यात आला.मृताची पत्नी हेमलता सुभाष परदेशी यांच्या फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 382-2025 नुसार, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103-1, 351-2-3, 352.3-5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.