महाकालचं दर्शन घेऊन घराकडे निघाले, वाटेत भीषण अपघात, इस्त्रोत शास्त्रज्ञ असलेल्या मुलासह आई-वडिलांचा मृत्यू.

बुलढाण्यात कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात इस्त्रोच्या एका शास्त्रज्ञाचा त्याच्या आई-वडिलांसह मृत्यू झाला आहे. हे कुटुंब नांदेडचं राहणारं असून ते महाकालच्या दर्शनावरुन परतत असताना हा अपघात झाला. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून नांदेडला परतत असताना कार नादुरुस्त ट्रकवर धडकली. या भीषण अपघातात आई, वडील व मुलाचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा तालुक्यात खातखेड फाट्याजवळ मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.देवराव गंगाराम पवार (वय ६०), बबिता देवराव पवार (वय ५५), निकेतन देवराव पवार (वय २६) अशी मृतांची नावे आहेत. मोनिका देवराव पवार, प्रियंका देवराव पवार, भूमिका रामराव पवार, हितांशी जीवन राठोड व कारचालक संतोष भगवान कदम हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निकेतन देवराव पवार हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) शास्त्रज्ञ म्हणून कामाला होते. ते नुकतेच इस्त्रोमध्ये रुजू झाले होते. ते सुट्टीवर घरी आले होते आणि आपल्या कुटुंबासोबत महाकालच्या दर्शनाला उज्जैनला गेले होते. तेथून परतत असताना हा भीषण अपघात झाला.नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात येणाऱ्या लोकरवाडीचे रहिवासी असलेले पवार कुटुंबीय देवदर्शनासाठी उज्जैन येथे गेले होते. परतीच्या प्रवासात असताना नांदुरा तालुक्यातील खातखेड फाट्याजवळ मंगळवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास भरधाव एमएच-२६-सीई-६२४५ क्रमांकाची इर्टिगा कार एमपी-०९-डीएम-१३६२ क्रमांकाच्या उभ्या ट्रकवर धडकली. या भीषण अपघातात तिघांचा बळी गेला.

तर एकाच कुटुंबातील चार महिलांसह चालकाची प्रकृती चिंताजनक आहे.अपघातप्रकरणी नीलेश आदुसिंग राठोड रा. नाईकनगर (हेटी, ता. आर्णी) यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २८१, १०६ (१), १२५ (अ) (३), ३२४(४), ३२३ (५) तसेच मोटार वाहन कायदा १८४, १३४/१७७, १२२/१७७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विलास पाटील करीत आहेत.टायर रिमोल्डींग पट्टा निघाल्याने चालकाने कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न बाळगता दुसऱ्यांच्या जीवाला धोका होईल अशा पद्धतीने ट्रक रस्त्याच्या मध्यभागी उभा केला होता. वाहनाला कुठलेही इंडिकेटर चालू ठेवले नव्हते. त्यामुळे कारचालकाला समोरील वाहन दिसू शकले नाही. ट्रकचालकाच्या हलगर्जीने तिघांचा जीव गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.