बीडच्या केज तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्पावर दुर्दैवी घटना घडली आहे. सौर प्रकल्पावर कार्यरत असलेला अभियंता पोहण्यासाठी खदानीच्या पाण्यात गेला होता. त्या ठिकाणी त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.बीडच्या केज तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्पावर दुर्दैवी घटना घडली आहे. सौर प्रकल्पावर कार्यरत असलेला अभियंता पोहण्यासाठी खदानीच्या पाण्यात गेला होता. त्या ठिकाणी त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सचिन गोरे असे या अभियंत्याचे नाव असून तो लातूर येथील रहिवासी आहे. एका खडी क्रेशरवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याच्या तो त्याठिकाणी गेला होता.
वृ्त्तानुसार, कानडी माळी परिसरात एका प्रायव्हेट कंपनीद्वारे सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचे काम काम सुरू होते. सचिन गोरे या ठिकाणी कार्यरत होता. त्याच्यासोबत इतर ८ सहकारी देखील होते. तो त्याच्या सहकाऱ्यांसह जवळच असलेल्या एका खदानीमध्ये पोहण्यासाठी उतरला होता. परंतु यादरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने सचिन बुडू लागला. त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरड करून त्यांना वर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बुडाला. खदान खूप खोल असल्यामुळे त्याचा मृतदेह सापडला नाही.खूप शोध घेऊनही तो मिळाला नसल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.









