‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. आरती रोजेकर यांची १५ मे पासून मुलाखत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘बदलते वातावरण, मानसिक ताणतणाव तसेच माता व बालकांचे आरोग्य’ या विषयावर हिंदुजा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 15, शुक्रवार दि. 16, शनिवार दि. 17 आणि सोमवार दि.19 मे 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, निवेदिका रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

बालके हे देशाचे भविष्य आहेत, कोणत्याही देशाचा सर्वांगीण विकास हा त्या देशातील महिला व बालकांचे सुदृढ आरोग्य, शैक्षणिक विकास तसेच आर्थिक सक्षमतेवर अवलंबून असतो. ही बाब विचारात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे. यादृष्टीने शासन स्तरावर विविध योजना आणि उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत.

बदलते वातावरण व जीवनशैली यामुळे मानसिक ताणतणाव याचबरोबर आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून महिला व बालकांच्या आरोग्यासाठी घ्यायची खबरदारी, याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोजेकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.