तुमच्या गौरीचे मार्क पाहिलेत का? दहावीच्या पेपरनंतर लेकीचं टोकाचं पाऊल, निकाल ऐकताच मातेने फोडला टाहो.

दहावीचा निकाल लागल्यावर इतर विद्यार्थ्यांच्या घरात आनंदोत्सव साजरा होत असताना मनमाडच्या गायकवाड चौकातील खरातांचे घर प्रतिकूल परिस्थितीत कन्या दहावी उत्तीर्ण झाल्याचे कळूनही दुःखात बुडाले होते.’तुमची गौरी दहावीची परीक्षा पास झालीय,’ हे शब्द त्या परिस्थितीने गांजलेल्या गरीब आईच्या कानावर पडताच त्या माऊलीने अक्षरशः टाहो फोडला. कारण, हा निकाल बघायला व शाळेतून कॉलेजच्या जगात एंट्री करायला गौरी जगात होतीच कुठे? ‘तू होणार होतीस कुटुंबाचा आधार, पण अकाली सर्वांचा निरोप घेऊन दिले दुःख अपार…’ अशीच काहीशी भावना गौरीच्या कुटुंबीयांच्या मनातून पाझरत साश्रुनयनांद्वारे सर्वांसमोर येत होती.मंगळवारी दहावीचा निकाल लागल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घरात आनंदोत्सव साजरा होत असताना मनमाडच्या गायकवाड चौकातील खरातांचे घर प्रतिकूल परिस्थितीत कन्या दहावी उत्तीर्ण झाल्याचे कळूनही दुःखात बुडाले होते.

दहावीची परीक्षा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांत किरकोळ कारणाने थेट आत्महत्येचं पाऊल उचलून देवाघरी गेलेली त्यांची लाडकी कन्या गौरी निकालाच्या दिवशी घरातच नव्हे, तर या जगातच नव्हती. ही भावना कुटुंबीयांचे काळीज कुरतडणारी होती.मोलमजुरी करणारे खरात दाम्पत्य मुलीला शिकवून घरातील गरिबीचे दिस जातील, याची आस लावून बसले होते. पण, मुलगी अचानक गेली व आशेवर पाणी फेरले गेले. इंडियन हायस्कूलमधील गौरी दहावी उत्तीर्ण झाली ही बातमी सामाजिक कार्यकर्ते अॅड. सुधाकर मोरे यांनी तिच्या पालकांना दिली आणि त्यांना अक्षरशः रडू कोसळलं.

जिथे रोज पोटासाठी जगण्यामरण्याची लढाई त्या घरातील मुलीने दहावीची परीक्षा ४४ टक्क्यांनी उत्तीर्ण होणे ही बाब लाखमोलाची होती. ‘तिला नर्स व्हायचं होतं. मैत्रिणीची आई जशी समाजसेवा करते तसं तिला करायचं होतं,’ असे रडत रडत उषा खरात सांगत होत्या. या माऊलीचे सांत्वन करणे सर्वांना जड गेले.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत मंगळवारी (दि. १३ मे) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्याचा निकाल ९४.१० टक्के लागला. नाशिक विभागाचा निकाल ९३.०४ टक्के लागला असून, राज्यात नाशिक विभाग पाचव्या क्रमांकावर राहिला. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २.२४ टक्के घट झाल्याचे दिसून आले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.