तुम्ही भारतमातेची काळजी घ्या, मी तुमच्या माऊलीला बरं करतो; डॉक्टरांचा शब्द, पुण्याचा CRPF जवान देशसेवेला रवाना.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निगडाळे येथील सीआरपीएफ जवान बापू सीताराम भोईर यांच्या मातोश्रींना विषारी सर्पदंश झाला होता. विषारी सर्पदंश झालेल्या आईला उपचारांसाठी नारायणगाव येथील सर्पदंश व विषबाधातज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांच्या दवाखान्यात दाखल करून केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) कर्तव्य बजावत असलेले जवान बापू सीताराम भोईर हे देशसेवेसाठी कर्तव्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे या वीर जवानाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निगडाळे येथील सीआरपीएफ जवान बापू सीताराम भोईर यांच्या मातोश्रींना विषारी सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारांसाठी नारायणगाव येथील सर्पदंश व विषबाधा तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र देशसेवेसाठी पहलगाम येथे रवाना होऊन त्यांनी मातृभक्तीसोबत कर्तव्यनिष्ठेचे उदाहरण घालून दिले आहे.

बापू भोईर हे राष्ट्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) मध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्रिपुरा आणि श्रीनगर येथे त्यांनी 13 वर्षे देशसेवा केली आहे. सध्या ते पहलगाम येथे तैनात आहेत. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक महिन्याच्या सुट्टीसाठी २९ एप्रिल रोजी गावी आले होते. दोन मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या आई पार्वताबाई भोईर (वय 60) यांना भातखाचराची भाजणी करताना ‘फुरसे’ या विषारी सर्पाने पायाला दंश केला. त्यांना प्रथम मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना डॉ. सदानंद राऊत यांच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

आईच्या उपचारादरम्यान भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बापू यांची रजा रद्द करण्यात आली. 8 मे रोजी त्यांना त्वरित पहलगाममधील कुलग्राम येथे हजर राहण्याचे आदेश मिळाले. आईच्या उपचारांची जबाबदारी डॉ. राऊत यांच्यावर सोपवून बापू निर्धास्तपणे देशसेवेसाठी रवाना झाले.“तुम्ही काळजी करू नका, आईला व्यवस्थित उपचार करून घरी सोडू,” असे आश्वासन डॉ. राऊत यांनी दिले. डॉ. राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बापू यांना मानसिक आधार देत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला. बापू यांच्या या त्यागामुळे त्यांचे गावात आणि परिसरात कौतुक होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.