पुणेकरांच्या खिशाला कात्री! पीएमपी बसचा प्रवास महागला, तिकीट दरात तब्बल ‘इतकी’ वाढ.

पीएमपीच्या तिकिट मशिन आणि अन्य यंत्रणांमध्ये बदल केल्यानंतर साधारण पंधरा दिवसांत नवे तिकीटदर लागू होतील. पीएमपीने यापूर्वीची दरवाढ २० डिसेंबर २०१४मध्ये केली होती. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचा प्रवास दुपटीने महागला आहे. सन २०१४नंतर प्रथमच दरवाढ झाली आहे. त्यानुसार किमान तिकीट दहा रुपये असेल. पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीत दैनंदिन पास ४० ऐवजी ७० रुपयांना, पीएमआरडीए हद्दीत १२०ऐवजी १५० रुपयांना, तर मासिक पास ९०० रुपयांऐवजी १५०० रुपये असेल.
पीएमपीच्या तिकिट मशिन आणि अन्य यंत्रणांमध्ये बदल केल्यानंतर साधारण पंधरा दिवसांत नवे तिकीटदर लागू होतील. पीएमपीने यापूर्वीची दरवाढ २० डिसेंबर २०१४मध्ये केली होती. राज्य परिवहन मंडळ, बेस्ट तसेच नागपूर शहर बससेवा यांनी केलेल्या तिकिट दरवाढीच्या आधारावर पीएमपीने नव्याने दरवाढीचा प्रस्ताव तयार केला होता.

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठीच्या पास दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ‘पीएमआरडीए’च्या मासिक पासचा दरही कायम आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी कंत्राटी भरती करण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली.नव्या रचनेनुसार एक ते ३० किलोमीटर अंतरासाठी पाच किलोमीटरच्या अंतराने सहा टप्पे, तर त्यापुढील ३० ते ८० किलोमीटर अंतरासाठी दहा किलोमीटरच्या अंतराने पाच टप्पे अशा एकूण ११ टप्प्यांमध्ये नवीन तिकीटदर निश्चित करण्यात आले आहेत.पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) लवकरच एक हजार बसची खरेदी केली जाणार आहे. यापैकी पाचशे बस पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, तर पाचशे बस पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्वतंत्रपणे खरेदी करणार आहे,

असा निर्णय मंगळवारी पीएमपीच्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला. पुणे महापालिकेचे आयुक्त व ‘पीएमपी’चे संचालक डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली.पहिला टप्पा —५ किलोमीटर – १० रुपये,दुसरा टप्पा —५.१ ते १० – २० रुपये,तिसरा टप्पा —१०.१ ते १५ – ३० रुपये,चौथा टप्पा —१५.१ ते २० – ४० रुपयेनव्या रचनेनुसार पीएमपी व महामेट्रो सेवेचे एकत्रीकरण अधिक सुसंगत होईल. तसेच ई-तिकीट’ प्रणाली व नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये सुसंगता येईल. प्रवासभाडे दर अचूक राहून ही तिकीटरचना प्रवासी व सेवकांना समजण्यास सोपी जाईल. – डॉ. दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष, पीएमपीएमएल

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.