वडिलांना मुखाग्नी देऊन पेपरला गेलेला, दहावीच्या निकाला सुरजने पित्याचं नाव राखलं, अभिमानास्पद गुण.

नांदेड जिल्ह्यातील सूरज जाधव या विद्यार्थ्याने वडिलांच्या निधनानंतरही दहावीची परीक्षा दिली. त्याने ५५.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी येथे त्याचे मूळ गाव आहे. सूरजचे वडील संजय जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. दुःखाच्या परिस्थितीतही त्याने इंग्रजीचा पेपर दिला. मुख्याध्यापक अरविंद राठोड यांनी त्याला मदत केली. सूरजच्या शिक्षणाची जबाबदारी आता शाळेने घेतली आहेदहावी बोर्डाची परीक्षा सुरु असताना वडिलांचे अचानक निधन झाले. कुटुंबियांवर दुःखाच डोंगर कोसळलं, तर मुलाच्या डोक्यावरील वडिलांच छत्र हरवलं. अश्या दुःखाच्या प्रसंगात ही मुलाने जड अंतःकरणाने वडिलांना मुखाग्नी देऊन इंग्रजी विषयाचा पेपर दिला आणि दहावीच्या परिक्षेत सूरज संजय जाधव याने यश प्राप्त केले. सूरज जाधव याने ५५. २० टक्के गुण घेऊन तो दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे.

सुरज जाधव हा यवतमाळ जिल्हयातील उमरखेड तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. तो नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील इंदिरा गांधी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. किनवट येथील सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर त्याने परिक्षा दिली आहे. १ मार्च रोजी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास सुरजचे वडील संजय जाधव यांचे दिर्घ आजाराने निधन झाले होते. या दिवशी सूरजचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. या दुखातून सावरणे त्याला कठिण होते. तो परिक्षा देण्याच्या मानसिकतेत नव्हता. त्याने शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून मी परीक्षा देऊ शकत नाही असे सांगितले होते.मुख्याध्यापक राठोड यांनी त्याच्या टाकळी गावी जाऊन सुरजचे सांत्वन करत परिक्षेसाठी तयार केले.

वडिलांना मुखाअग्नी देऊन सूरजने इंग्रजी विषयाचा पेपर दिला. इंग्रजी विषयात त्याने ३५ गुण मिळवले आहे. ज्या परिस्थ‍ितीत त्याने यश मिळवले ते कौतुकास्पद आहे. सुरजच्या डोक्यावरील वड‍िलांचे छत्र हरवल्याने कुटूंबाचीही जबाबदारी त्याच्यावर आली आहे. आई व एक बहिणी असून ती इयत्ता बारावीत शिकत आहे. सध्या सुरज मिळेल ते काम करत घर चालविण्यासाठी हतभार लावत आहे.दरम्यान, सुरजला हा अभ्यासा हुशार आहे. मात्र, ऐनवेळी दुखाद घडली. त्याची परिस्थ‍िती बिकट आहे. त्यामुळे तो पुढील शिक्षण घेऊ शकत नाही. अश्या परिस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांनी सूरज जाधव याच्या शिक्षाची जाबाबदारी घेतली आहे. त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न राहिल, असे गोकुंदा येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.