जिगरबाज आर्यची ‘असाध्य’ यशाला गवसणी; दुर्मीळ आजाराशी सामना करीत दहावीत मिळविले ९६ टक्के.

वयाच्या दीड वर्षापासून स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी या अशाच असाध्य आजाराशी दोन हात करणाऱ्या आर्य ठोके या जिगरबाज विद्यार्थ्यांने दहावीत ९६ टक्के गुण मिळवून ‘असाध्य’ यशाला गवसणी घालत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.आपला आजार कधीच बरा होणार नाही याची पूर्ण जाणीव असणाऱ्या आणि आपली आयुर्मर्यादा नेमकी किती याचा कोणताच अंदाज नसणाऱ्या व्यक्तीसाठी आयुष्य हीच मोठी परीक्षा असते! वयाच्या दीड वर्षापासून स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी या अशाच असाध्य आजाराशी दोन हात करणाऱ्या आर्य ठोके या जिगरबाज विद्यार्थ्यांने दहावीत ९६ टक्के गुण मिळवून ‘असाध्य’ यशाला गवसणी घालत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
‘माझ्या क्षमता मला माहिती आहेत. त्या वाया जाऊ नयेत, यासाठी मी नेहमीच प्रयत्न करतो. तसाच प्रयत्न मी दहावीच्या परीक्षेसाठी केला,’ असा दृष्टिकोन असणारा आर्य ठोके आज त्याच्या कुटुंबासह शाळेचाही अभिमान बनला आहे. दुसरीपासून कधीही शाळेत न जाता केवळ स्वयंअध्ययनाद्वारे आर्यने दहावीत ९६ टक्के मिळविले आहेत.

उत्तरानगर परिसरात राहणाऱ्या योगेश आणि सुप्रिया ठोके यांचा तो मुलगा असून, वडील व्यावसायिक आहेत, तर आई गृहिणी आहे.स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी हा आजार आपल्या मुलाला असल्याचे समजल्यानंतर आर्यच्या कुटुंबीयांनी त्याच्या उपचारांसाठी अनेक प्रयत्न केले. पण, या आजारावर जगभरात कोणतेही उपचार नसल्याचे समजल्यानंतर त्याच्या कुटुंबाने आहे त्या परिस्थितीत आर्यची जडणघडण सुरू केली. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासह परिस्थितीला तोंड देत शंभर टक्के योगदान देण्याचा दृष्टिकोन विकसित केला. त्याच्याच जोरावर हे यश मिळविणारा आर्य अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा बनला आहे.स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी एक आनुवंशिक आजार आहे. यामध्ये मेंदूकडून शरीरातील स्नायूंना सूचना मिळणे हळूहळू बंद होते. त्यामुळे त्या अशा बहुतांश व्यक्तींचे स्नायू कमकुवत होताच. त्याचा परिणाम संबंधित व्यक्तीच्या शारीरिक हालचालींवर होतो.

हा आजार असलेल्या व्यक्तींना कालांतराने कोणतीही हालचाल करता येत नाही. शारीरिकदृष्ट्या ते पूर्णतः परावलंबी असतात. त्यांची आयुर्मर्यादाही सामान्य व्यक्तींपेक्षा कमी असते.इयत्ता दुसरीपासून शाळेत न जाता होम स्कूलिंगद्वारे आर्यने घरीच अभ्यास सुरू ठेवला. रवींद्रनाथ इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून त्याने दहावीची परीक्षा दिली. यामध्ये त्याला लेखनिक म्हणून सहाय्य मिळाले अनिता देवासे या नववीच्या विद्यार्थिनीचे. आपल्या क्षमतांची जाणीव असणाऱ्या आणि या क्षमता सिद्ध करण्यासाठी असाध्य आजाराचा अडथळा झुगारणाऱ्या आर्यने या यशाच्या जोरावर फिजिक्स विषयात संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. आपले हे ध्येय आपण नक्कीच साध्य करू, असे तो आत्मविश्वासाने सांगतो.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.