महाराष्ट्राचा मानबिंदू! अमरावतीचे बी. आर. गवई बनले देशाचे ५२ वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ.

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. अनुसुचित जाती वर्गातील दुसरे सरन्यायाधीश देशाला लाभणार आहेत. तर गवई हे मुळचे महाराष्ट्रातील अमरावतीचे असल्याने राज्याची अभिमानाचा क्षण आहे. वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे उत्तराधिकारी म्हणून सरन्यायाधीश पदावर रुजू होत आहेत.न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. अनुसुचित जाती वर्गातील दुसरे सरन्यायाधीश देशाला लाभणार आहेत. तर गवई हे मुळचे महाराष्ट्रातील अमरावतीचे असल्याने राज्याची अभिमानाचा क्षण आहे. तसेच ते पहिले बौद्ध सरन्यायाधीश असल्याने भारतीय न्यायव्यवस्थेच्या व्यापक आणि सर्वसमावेशकतेच्या दृष्टीकोनातून त्यांची नियुक्ती महत्वाची ठरत आहे. वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे उत्तराधिकारी म्हणून सरन्यायाधीश पदावर रुजू होत आहेत.

राष्ट्रपती भवनात बी आर गवईंचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी बी आर गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. संविधानाच्या कलम १२४(२) अंतर्गत गवईंचे नियुक्तीपत्रक काढण्यात आले, ज्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब करत त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.मे २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयात रुजू झाल्यापासूनच त्यांनी देशासाठी प्रमुख निर्णयांत महत्वाची भूमिका बजावली. गेल्या ६ वर्षांत त्यांनी ७०० खंडपीठांत हे सहभागी होते. ज्यामधून त्यांनी जवळपास ३०० निर्णय घेतले आहेत. त्यांचे न्यायलयीन व्यापक आहे.

त्यांनी प्रशासकीय बाबींपासून ते दिवाणी, फौजदारी, व्यावसायिक आणि पर्यावरणीय कायद्यांसाठी उल्लेखनीय निर्णय घेतले आहेत. न्यायमूर्ती गवईं ऐतिहासिक निर्णयांचा आदर्श देशासमोर ठेवतील.गवई हे कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या, निवडणूक रोखे रद्द करणाऱ्या आणि २०१६ च्या नोटाबंदीच्या उपक्रमाची वैधता असलेल्या मोठ्या घटनापीठांचे ते भाग राहिले आहेत. तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणात आप नेते मनीष सिसोदिया यांना जामीन देणे, ‘मोदी’ आडनावाशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देणे आणि २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित प्रकरणात नागरी हक्क कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना नियमित जामीन मंजूर करणे, अशा अनेक हाय-प्रोफाइल निर्णयांत देखील त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.