महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मुलगा बेपत्ता, लग्नाच्या आदल्या दिवशी सामान आणायला गेला अन्…

ऐन लग्नाच्या तोंडावर मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध सुरु केला आहे.शहरातील काँग्रेस नेते तथा अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाला आहे. वैभव मोहोड लग्नाच्या एक दिवस आधीच बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या वैभव मोहोड याचा आज, बुधवारी विवाह होता. लग्नासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी तो बाहेर गेला. मात्र बराच वेळ होऊनही मुलगा घरी न परतल्याने वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून वैभव मोहोड याचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे, त्याने सकाळी एटीएममधून चाळीस हजार रुपये काढल्याची चर्चा आहे.

हरिभाऊ मोहोड हे अमरावती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी देखील करण्यात आली होती. हरिभाऊ मोहोड हे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे कट्टर पाठिराखे म्हणून ओळखले जातात. विदर्भातील अभ्यासू नेते म्हणून हरिभाऊ मोहोड यांना मानले जाते.दरम्यान, ऐन लग्नाच्या तोंडावर मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध सुरु केला आहे.दुसरीकडे, जळगावातील एका तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. तरुणाचं लग्न अवघ्या आठ दिवसांवर आलं असताना त्याने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवल्याची घटना घडली.

बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने आत्महत्या केल्यान सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री तरुणाने कुटुंबासोबत जेवण केलं, त्यानंतर तो शेतात गेला, मात्र तिथून घरी परत आलाच नाही. त्यानंतर शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं.लग्नघरात विवाहाची धामधूम सुरु होती. पाहुणे मंडळींना पत्रिका वाटल्या जात होत्या. आठवडाभरावर लग्न आल्यामुळे घरात मोठी तयारी सुरु होती, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, असं असतानाच फक्त 21 वर्षांचा नवरदेव अमोल वाल्मिक पाटील याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.