घरात लग्नाची धामधूम; पण बोहल्यावर चढण्याच्या ८ दिवस आधी तरुणाचा टोकाचा निर्णय, रात्री शेतात गेला तो परतलाच नाही.

जळगावात एका तरुणाचं लग्न अवघ्या आठ दिवसांवर असताना, त्याने धक्कादायकपणे आयुष्याचा शेवट केला. लग्नाच्या धामधुमीत अमोल पाटील याने टोकाचा निर्णय घेतला. या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.जळगावात एका तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. तरुणाचं आठ दिवसांवर लग्न आलं असताना त्याने आपलं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने टोकाचं पाऊल उचललं. सोमवारी रात्री तरुणाने कुटुंबासोबत जेवण केलं. त्यानंतर तो शेतात गेला, मात्र घरी परतलाच नाही. त्यानंतर शेतात झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं.लग्न घरात लग्नाची धामधूम सुरु होती. पाहुणे मंडळींना पत्रिका वाटप सुरु होतं.

आठवडाभरात लग्न आल्याने घरात तयारी आणि आनंदाचं वातावरण होतं. असं असताना उपवर अमोल वाल्मीक पाटील (२१, रा. वाकडी, ता. जळगाव) या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील वाकडी येथील शेतामध्ये मंगळवारी, १३ मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लग्नाच्या आनंदाच्या क्षणी होणाऱ्या नवरदेवाने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.वाकडी येथे आई, वडील, दोन भावांसह राहणारा अमोल पाटील हा वडिलांना शेती कामात मदत करत होता. अमोल याचं खामखेडा, ता. मुक्ताईनगर येथील मुलीशी लग्न ठरलं होतं.

२० मे रोजी हळद आणि २१ मे रोजी लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी देखील सुरू होती.मात्र सोमवारी, १२ मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तो शेतात गेला. नंतर घरी परतलाच नाही. सकाळी काही ग्रामस्थांना अमोल पाटील हा शेताच्या बाजूला एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याची माहिती तात्काळ त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्याला लगेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून अमोल याला मृत घोषित केलं.लग्नाच्या केवळ आठ दिवस आधी तरुणाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामागे नेमकं कारण काय होतं, लग्न जवळ आलं असताना त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.