आई-वडील कामावर, घरी लेकीने नको ते केलं; पाहताच आजीने हंबरडा फोडला, अख्खं गाव सुन्न.

अभ्यासाच्या तणावातून एका विद्यार्थिनीने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.पॉलिटेक्निकचं शिक्षण घेणाऱ्या शेतकरी कुटुंबातील १८ वर्षीय विद्यार्थिनी राहत्या घरात लोखंडी रॉडला ओढणीच्या साह्याने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. ही घटना गंगापूर तालुक्यातील कोल्हापूर शिवारात मंगळवारी (13 मे) उघडकीस आली. या विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून आपलं जीवन संपवलं असावं, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
सोनाली पांडुरंग पवार (वय 18 रा. कोडापुर तालुका गंगापूर) असं गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील कोडापूर शिवारामध्ये पवार कुटुंब वास्तव्यास आहे.

पांडुरंग पवार हे शेती करतात. त्यांना पाच मुली असून ते पत्नी, मुली, आईसह वास्तव्य करतात. सोनाली ही बिडकीन येथील गेवराई तांडा येथे असलेल्या धनेश्वरी कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होती. दरम्यान, मंगळवार 13 मे रोजी सोनालीचे वडील पांडुरंग पवार हे वैजापूर येथे गेले होते. तर सोनालीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी सोनाली आणि आजी घरी होती.तेव्हा अकरा वाजेच्या सुमारास सोनालीने गळफास घेतल्याचं तिच्या आजीच्या निदर्शनास आले. यावेळी आजीने एकच आरडाओरड केली.

अचानक आजीने आरडाओरड केल्याने शेजारी धावून आल. यावेळी नागरिकांच्या मदतीने सोनालीला खाली उतरवून तात्काळ गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.सोनाली ही पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होती. शिक्षण सुरळीत सुरू असताना अचानक तिने हे टोकाचं पाऊल उचललं. तिने असं का केलं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरी अभ्यासाच्या तणावातून तिने हा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळतात त्यांनी एकच टाहो फोडला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.