शांत चेहऱ्यामागे वादळ दडलेलं, पुण्यातील कष्टाळू दाम्पत्याने आयुष्य संपवलं, हादरवणारं कारण समोर.

नागनाथ आणि उज्वला हे वाघोलीतील दैनंदिन बाजारात फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. काबाडकष्ट करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, सततच्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलावाघोली परिसरातील आव्हाळवाडी येथे पती-पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सोमवारी रात्री घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. नागनाथ वारुळे (वय ४३) आणि त्यांची पत्नी उज्वला वारुळे (वय ४०) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरु केला आहे. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागनाथ आणि उज्वला हे वाघोलीतील दैनंदिन बाजारात फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. काबाडकष्ट करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, सततच्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, असा संशय आहे.

या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.वारुळे दाम्पत्य कष्टाळू आणि शांत स्वभावाचे होते. त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाघोली पोलीस मृत्यूमागील नेमकं कारण शोधण्यासाठी सखोल तपास करत असून, नातेवाईक आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.या घटनेने आर्थिक तणावामुळे होणाऱ्या मानसिक दडपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समाजात अशा घटना रोखण्यासाठी आर्थिक आणि मानसिक आधाराची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.दुसरीकडे, दहावीच्या परीक्षेत ३९ टक्के इतके कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही धक्कादायक घटना चऱ्होली फाटा येथील तनिष्क सोसायटीत मंगळवारी (१३ मे) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली.मंगळवारी (१३ मे) दहावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थिनीने दहावीची परिक्षा दिली होती. काल दुपारी एकच्या सुमारास तिने मोबाइलवर निकाल पाहिला. त्यानंतर काही वेळाने ती घरातील शयनगृहात गेली.बराच वेळ विद्यार्थी बाहेर न आल्याने तिच्या आईने शयनगृहात जाऊन पाहिले असता ती साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. शेजाऱ्यांनी त्वरीत दिघी पोलिसांना कळविले. बेशुद्धावस्थेतील तिला त्वरीत महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.