जळगांव- देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अर्ध सैनिक बलातील जवानांच्या व्यथा शासन दरबारी पोहोचाव्या याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आज सकाळी जळगाव जिल्ह्यातील निवृत्त अर्ध सैनिक बलातील जवान व शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीयांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडले. अर्ध सैनिक बल यांच्या महत्वाच्या मागण्या खालील प्रमाणे ..अर्ध सैनिक बलाचे कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे.जिल्ह्यातील सर्व निवृत्त जवानांची सैनिक कार्यालयात नोंदणी व्हावी. सेवा बजावताना वीरमरण आलेल्या जवानांचे शहीद स्मारक त्यांच्या गावी उभारण्यात यावे. नगरपालिका/ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घर असलेल्या जवानांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये १००% सूट द्यावी. निवृत्त जवानांना योग्य सन्मान व सरकारी योजनांचा लाभ मिळावा.










