14 मे रोजी मिथुन धेंडे यांचा वाढदिवस होता, मात्र त्याच्या आदल्याच दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातला.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरने चिरडल्यामुळे पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात कार्ला फाटा येथे मुंबईकडून चाकणच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनर चालकाने वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदाराला चिरडले. मिथुन धेंडे, वय 38 वर्षे, असे मयत पोलिसाचे नाव आहे.मंगळवारी रात्री साधारण 9 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास कंटेनरने पोलीस हवालदाराला चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे 14 मे रोजी मिथुन धेंडे यांचा वाढदिवस होता, मात्र त्याच्या आदल्याच दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातला.










