यावल प्रादेशिक वनविभागातर्फे यंदाही बुध्द पौणिमेच्या रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली.

बुध्द पौणिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील धरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून पावल प्रादेशिक वनविभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली. यावर्षी यावल वनविभागाने बुध्द पौणिमेचे अवचित्त साधुन प्राणी गणनेसाठी निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी यांना सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली होती. प्राणी गणनेमध्ये सहभागी होण्यासाठी QR Code मार्फत रजिस्ट्रेशन करण्यात आलेले होते.यावल प्रादेशिक वनविभागातील मचाणीवर रात्री बुध्द पौर्णिमेच्या दिवशी निसर्गानुभव घेत असताना प्राणी गणनेसाठी आलेल्या निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, वन अधिकारी/कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांना रात्री प्राणी गणना करीत असतांना प्रामुख्याने बिबट, अस्वल, कोल्हा, लांडगा, ससा, भेकर, निलगाय, रानडुक्कर, तडस, मोर, रानमांजर, चिंकारा, चौशिंगा, काळवीट, साळिंदर, घुबड, वटवाघुळ, रातवा, भारद्वाज, सातभाई, बुलबुल, बगळा, रॉबिन, किंगफिशर, टिटवी, अजगर, पान दिवड (साप) असे एकुण 27 पेक्षा जास्त वन्यजीवांच्या प्रजातींची नोंद करुन निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी यांनी त्यांचा अभिप्राय नोंदविला.

यावल प्रादेशिक वनविभागात एकूण 492 वन्यप्राणी व पक्षी यांची नोंद करुन निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी यांनी त्यांचा अभिप्राय नोंदविला व उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.सदर निसर्ग अनुभव कार्यक्रमासाठी  अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक नखाते,  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कंम्पा), यावल समाधान पाटील, तहसीलदार रावेर बंडू कापसे, मानद वन्यजीव रक्षक, जळगाव रविंद्र फालक व वन्यजीव अभ्यासक अमन गुजर तसेच वावल वनविभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचेसह विविध संस्थेचे पदाधिकारी, महाविदयालयीन प्राध्यापक व विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी असे 150 पेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदविला.

यावल प्रादेशिक वनविभागातील रावेर बनक्षेत्रात बिबटचे दर्शन देखील निसर्गप्रेमी व पर्यावरण प्रेमी यांना घडले असुन वनक्षेत्र वैजापूर मधील निसर्ग पाऊलवाटच्या मार्गावर बिबटच्या पाऊलखुणा आढळल्या. यावल प्रादेशिक वनविभागातील जंगल हे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. जंगल सफारीचे पर्यटकांमध्ये नेहमी आकर्षक आहे. घनदाट जंगलातून जातांना केवळ समृध्द वनांचेच दर्शन न घडता त्यामध्ये अधिवास करणारे विविध पशु-पक्षी, फुले व निसर्ग संपदा देखील यावल वनविभागात दिसून येते.सदर कार्यक्रमाचे नियोजन  वनसंरक्षक (प्रा.) धुळे वनवृत्त निनू सोमराज,  उप वनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव), चोपडा प्रथमेश हाडपे व सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा), यावल समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजुर यांनी केले. “ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता यामुळे प्राणी गणनेत अडथळा निर्माण होईल असे वाटत असतांना वन्यजीवप्रेमी व पर्यावरणप्रेमीयांना काल रात्री निसर्गाचे विविध रूप अनुभवायला मिळाले, तसेच अचानक बदललेल्या बातावरणामुळे वन्य पशू-पक्षी यांचेही वेगवेगळे स्वभाव जवळून अनुभवायला मिळाल्याने बऱ्याच जणांना निसर्ग अनुभवाच्या धराराची प्रचिती आल्याच्या देखील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. “समाधान पाटील (सहाय्यक वनसंरक्षक

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.