अर्ध सैनिक बलातील जवानांच्या न्यायहक्कांसाठी मनसे चा ठाम आवाज.

जळगांव- देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अर्ध सैनिक बलातील जवानांच्या व्यथा शासन दरबारी पोहोचाव्या याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आज सकाळी जळगाव जिल्ह्यातील निवृत्त अर्ध सैनिक बलातील जवान व शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीयांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडले. अर्ध सैनिक बल यांच्या महत्वाच्या मागण्या खालील प्रमाणे .. अर्ध सैनिक बलाचे कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे.जिल्ह्यातील सर्व निवृत्त जवानांची सैनिक कार्यालयात नोंदणी व्हावी. सेवा बजावताना वीरमरण आलेल्या जवानांचे शहीद स्मारक त्यांच्या गावी उभारण्यात यावे. नगरपालिका/ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घर असलेल्या जवानांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये १००% सूट द्यावी. निवृत्त जवानांना योग्य सन्मान व सरकारी योजनांचा लाभ मिळावा.

या मागण्यांवर जिल्हाधिकारी महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, “महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याकरता जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत ठामपणे उभं आहे.” त्याचप्रमाणे, वीरमरण आलेल्या जवानांचे शहीद स्मारक त्यांच्या गावातच उभारण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासनही त्यांनी दिले. मनसे करणार पाठपुरावा करणार .. या विषयी लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली जाईल व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अर्ध सैनिक बल कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी ठोस पाठपुरावा केला जाणार आहे.अर्ध सैनिक बलातील जवानांचे योगदान शब्दात मावणारे नाही. मात्र, त्यांच्या समस्या, गरजा आणि व्यथा समजून घेऊन शासन आणि समाजाने त्यांना न्याय देणं ही आपली जबाबदारी आहे. या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जवानांसोबत आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी दिली.याप्रसंगी निवृत्त अर्ध सैनिक बलातील जवान विजय विजय सपकाळ, बाळू पाटील, रत्नाकर चौधरी, विजय सूर्यवंशी, रफिक शेख, शांताराम बोरसे, वीर पत्नी फरीदाबी उस्मान शेख,  वंदनाबाई पाटील यांच्यासह शहीद परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.