बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर कडक कारवाई सुरू केली आहे. वाल्मिक कराडच्या गुंडांवर मकोका लावल्यानंतर, आता तारेख खान, विशाल डांबे, गजानन जाधव आणि गणेश गिरी या चार कुख्यात गुंडांना हर्सूल कारागृहात पाठवण्यात आले आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, जिल्ह्यात गुन्हेगारी मोडून काढण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.बीड जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतत पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. बीड जिल्ह्याची सूत्र एसपी म्हणून नवनीन काँवत यांच्याकडे दिली गेली होतीत. बीडमध्ये पाऊल ठेवताच जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी त्यांनी कारवाई सुरू केली आहे. रविवारी ११ मे बीडमधील वाल्मिक कराडच्या काही गुडांवर मकोका दाखल केला होता. अशातच गुंडगिरी करणाऱ्यांना त्यांनी थेट जेलची हवा खायला पाठवलं आहे.










