शाळेच्या ऑफिसमध्येच संचालकांचे अश्लील चाळे, कल्याणमध्ये गलिच्छ प्रकार, पालकांचा संताप, ठाकरेसेना आक्रमक.

शाळेच्या कार्यालयातच संचालक अश्लील कृत्य करत असताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पालकांनी थेट कोलशेवाडी पोलीस ठाणे गाठले कल्याण पूर्व भागातील एका नामांकित खाजगी शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या संचालकाचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक प्रचंड संतप्त झाले आहेत.शाळेच्या कार्यालयातच संचालक अश्लील कृत्य करत असताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पालकांनी थेट कोलशेवाडी पोलीस ठाणे गाठले. संबंधित संचालकाच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू केली. याबाबत शाळेचे संचालक सदस्य महेश गायकवाड यांनी सांगितले, की संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी मी देखील अनेकदा तक्रारी केल्या आहेत.

शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि संस्काराचे ठिकाण असते, आणि अशा ठिकाणी अश्लीलता समोर येणे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी भावना पालकांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणात ठाकरे गटाने देखील आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आशा रसाळ यांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच शिक्षण मंडळाकडेही तक्रार करून कारवाईची मागणी करू असे सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले.याआधी, पुणे शहरातील कर्वेनगर येथील नामांकित शाळेत नृत्य शिक्षकाने चार अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार गेल्या वर्षी उघडकीस आला होता. या नृत्य शिक्षकाचा जामीन अर्ज विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाने नुकताच फेटाळला आहे. शाळेतील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी शिक्षक हा विद्यार्थ्यांचा पाठलाग करत त्यांच्या पाठोपाठ स्वच्छतागृहात जाताना दिसला होता.या प्रकरणात पीडित विद्यार्थ्यांची संख्या चार असून आरोपीने शिक्षक असतानाही अतिशय गंभीर गुन्हा केल्यामुळे आरोपी जामीन मिळण्यास पात्र नाही, असे नमूद करत विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा आदेश दिला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.