जालन्यामध्ये खळबळ! दिवसाढवळ्या बाप-लेकाचा खून, सख्खा भाऊ ताब्यात; नेमकं काय घडलं?

जालन्यातील बदनापूर शहरात दिवसाढवळ्या बाप-लेकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. अशोक आणि यश अंबिलडगे या दोघांची हत्या पैशाच्या देवाणघेवाणीतून झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी मृताच्या सख्ख्या भावाला ताब्यात घेतले असून, जालना शहरातून काही नातेवाईक आले असल्याची माहिती आहे.जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात भर दिवसा बाप लेकाचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील गुन्हेगारीचा उच्चांक मांडला आहे. जालना जिल्ह्यात सतत खून, लूटमार या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सतत पोलिसांवर टीका केली जाते. जालना शहरात नेमके काय चालले अशा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. दोन दिवसांपूर्वी भोकरदन नाक्यावरील घटनेला काही दिवस होत नाही तोच ही घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

प्राथमिक माहिती नुसार बदनापूर शहरातील शंकर नगर येथील रहिवाशी अशोक अंबिलडगे आणि मुलगा यश अशोक अंबिलडगे या बाप लेकाचा भर दुपारी २ वाजता खून झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक चांगलेच घाबरले आहेत. या मारहाणीत साधारणता ५ ते ६ जण सहभागी असल्याचं बोललं जात आहे. दोन भावांमध्ये पैशाच्या देवाण घेवाण झाले होते त्यामधून हा खून झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.या मारहाणीत जालना शहरातील काही आरोपी असल्याचे बोलले जाते मयत अशोक अंबिलदागे यांचा सख्खा भाऊ विष्णू अंबिलदागे याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. विष्णू अंबिलढगे आणि त्याचा सख्खा भाऊ मयत याला मारण्यासाठी जालना शहरातून त्याचे काही नातेवाईक या भांडणामध्ये सहभागी असल्याची माहिती प्राप्त होत आहे. अधिक तपास बदनापूर पोलिसा स्थेनचे पी आय सुदामा भागवत आणि त्यांचे पथक करीत आहे.दरम्यान, जालना जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तहसीलदारांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूलमधून चार राउंड झाडले. गोदावरी नदीच्या पात्राजवळ ही घटना घडली आहे. अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. पोलीस आता हल्ला करणाऱ्या अज्ञात वाळू माफियाच्या सदस्यांचा शोध घेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.