विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंना जोरदार धक्का बसला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ २० जागांवर विजय मिळाल्या. तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भोपळाही फोडता आला नाही.मुंबई: विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंना जोरदार धक्का बसला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ २० जागांवर विजय मिळाल्या. तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर दोन्ही ठाकरेंसाठी अस्तित्त्वाची लढाई सुरु झाली. गेल्याच महिन्यात दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला. राज आणि उद्धव यांनी सूचक विधानं करत मनोमिलनाचे संकेत दिले. त्यानंतर दोन्ही बंधू परदेशी निघून गेले आणि ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा थंडावली. पण आता राज यांच्या सुरु असलेल्या भेटीगाठी पाहात युती होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. उद्धव यांच्या अटींना राज यांनी केराची टोपली दाखवल्याचं दिसत आहे.’महाराष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी आमची भांडणं, वाद अतिशय क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय केवळ इच्छेचा आहे. माझ्या एकट्याचा इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे,’ असं राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबतच्या यु्तीच्या चर्चेवर म्हणाले होते.










