अमेरिका-पाकिस्तानसमोर झुकल्याचा आभास, विजय वडेट्टीवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणावर टीका केली. अमेरिकेपुढे झुकण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानचा उल्लेख वारंवार करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी राज्य सरकारवर नुकसान भरपाई देण्यास अपयशी ठरल्याचा आरोप केला. जातीय जनगणनेला त्यांनी समर्थन दर्शवले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर घणाघात केला आहे. अमेरिकेच्या संदर्भात दिलेल्या पंतप्रधानांच्या विधानांवर टीका करत वडेट्टीवार म्हणाले की, अमेरिकेपुढे झुकण्याची गरजच नव्हती. आमचे सैन्य सक्षम आहे. अशा वेळी पाकिस्तानसारख्या ‘चिल्लर’ देशाचा सतत उल्लेख करणं योग्य नव्हतं.वडेट्टीवारांनी पंतप्रधानांच्या भाषणात आत्मविश्वासाऐवजी हतबलतेची भावना उमटल्याचा आरोप केला. लोकांनी अपेक्षा केली होती की, पंतप्रधान कोणापुढे झुकणार नाहीत, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. जो विश्वास जनतेला होता, तो आता विश्वासघातात परिवर्तित होत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानच्या धमक्यांना भारताने कधीच गांभीर्याने घेतले नाही. तरीही पंतप्रधानांनी सतत पाकिस्तानचा उल्लेख करणे म्हणजे त्यांना अनावश्यक महत्त्व देणे आहे. भूतकाळात कोणत्याही पंतप्रधानांनी पाकिस्तानचे नाव घेतले नव्हते. पंतप्रधान मोदींचे भाषण अमेरिकेला इशारा देणारे असायला हवे होते, पण तसे काही दिसून आले नाही, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरून हल्ला चढवला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावर भाष्य करत ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या फळबागा, भाजीपाला आणि धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य आणि केंद्र सरकार मदतीस अपयशी ठरले आहेत.

त्यांनी तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली आणि केंद्र सरकारने एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा, असेही ते म्हणाले.विजय वडेट्टीवारांनी जितेंद्र आव्हाड यांच्या जातीय जनगणनेवरील भूमिकेचं समर्थन केलं. जातीय जनगणना ही काळाची गरज होती. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निर्णय झाला असला तरी ओबीसी समाजासाठी ही आवश्यक आहे, असं ते म्हणाले. जर कोणी ओबीसीची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टोला लगावला. राज ठाकरे यांच्याकडे आता सत्ता नसूनही सत्तेच्या बाहेरचं सत्ता केंद्र असल्यासारखं चित्र आहे. जे पक्ष आपला जनाधार गमावत आहेत, ते निवडणुकीच्या भीतीने आता राज ठाकरेंची भेट घेत आहेत, असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका केली. तर एकनाथ खडसे यांच्या बैठकीवरूनही त्यांनी शंका व्यक्त केली. ते बैठका घेत आहेत म्हणजे कदाचित बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतील, किंवा काही कारण काढून पडण्याची तयारी करत असावेत, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.