गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त.

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड 9 सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता.जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड 9  सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता. मात्र हा तळ उध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे सुमारे 200 जवान विशेष अभियानावर होते.  दरम्यान आज सकाळी (12 मे)  जंगल परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी  जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. सी-60 जवानांनीही प्रत्युत्तर दिले. ही चकमक तीन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोन तास चालू होती.चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझीन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर,

एक रेडिओ, तीन पिट्टु (सामानाची पिशवी), वॉकीटॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू सापडल्या. नक्षलवाद्यांचा तळ सी-60 जवानांनी पूर्णतः उद्ध्वस्त केला असून चकमकीत काही नक्षलवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणी टोकावर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर “कवंडे” जवळ (महाराष्ट्राच्या सीमेत) C-60 चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक घडली. आज सकाळी (12 मे) थोड्या थोड्या वेळानंतर त्याच परिसरात तीन ठिकाणी चकमक झाली. सुमारे दोन तास ह्या चकमकी चालल्या.

जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रतिउत्तर दिल्यामुळे नक्षलवादी पळून गेले. मात्र, काही नक्षलवादी जखमी झाले असून त्यांना नक्षलवादी सोबत घेऊन गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन बंदुकी, मोठ्या संख्येने जिवंत काडतूस व इतर नक्षली साहित्य जप्त केले असून नक्षलवाद्यांचे कॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. सध्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा, बिजापूर क्षेत्रातील गीदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीरसापारा, नेलगोडा, बोडगा आणि इकेली जंगल परिसरात नक्षलवादी कॅम्प लागल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली आहे. य भागात नक्षलवादी असल्याने पोलिस प्रशासन सतर्क आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.