पुण्यात भररस्त्यात तरुणीला संपवलं, शेजारीच निघाला मुख्य आरोपी.

पिंपरी चिंचवडमध्ये एका मुलीची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी 24 तासात खून करणाऱ्या आरोपींना जेरबंद केलं आहे.पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री 18 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. कोमल भरत जाधव (वय 18) असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी रस्त्यातच सपासप वार करून खून केला. या घटनेचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी 24 तासात खून करणाऱ्या आरोपींना जेरबंद केलं आहे. आता पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या वाल्हेकरवाडीमधील कृष्णाईनगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. घटनेच्या वेळी मयत कोमल आपल्या घरात होती. यावेळी बाईकवरून आलेल्या दोन आरोपींनी तिला घराबाहेर बोलवून घेतलं. कोमल घराच्या खाली असता आरोपींनी तिच्यावर निर्दयीपणे वार केले.

या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपींना जेरबंद केले आहे. उत्तर प्रदेशाचा रहिवासी असलेल्या 45 वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे.  आरोपींच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणी आणि आरोपी हे शेजारी राहत होते. दोघांमध्ये संबंध आणि आर्थिक व्यवहार देखील झाले होते. याच संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे आरोपींनी कट रचून कोमलची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कात्रजमधील गुजरवाडी परिसरात अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या कारणावरून एका जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली.

मृत व्यक्तीचे नाव मनोहर शिंदे (46, रा. पवारनगर, गुजरवाडी रस्ता, मांगडेवाडी, कात्रज) असे आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी रोहित ऊर्फ बुधाजी असोरे (32) आणि केशव असोरे (26, दोघे रा. खोपडेनगर, गुजरवाडी, कात्रज) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या नात्यातील एका महिलेचे आरोपी रोहित असोरे याच्याशी अनैतिक संबंध होते. रोहित पूर्वी रिक्षा चालवत होता, त्यानंतर त्याने प्रवासी वाहतूक व्यवसाय सुरू केला. मनोहर शिंदे यांनी या संबंधांना विरोध केला होता, याच कारणावरून त्यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. शुक्रवारी रात्री, रोहित, केशव आणि त्यांचे इतर साथीदार पवारनगर परिसरात आले आणि त्यांनी मनोहर शिंदे यांच्यावर लाथाबुक्क्यांनी आणि बांबूने जबर मारहाण केली. डोक्यात गंभीर इजा झाल्यामुळे शिंदे यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.