आयपीएलच्या नवीन वेळापत्रकामुळे मुंबई इंडियन्सला गुड न्यूज, दोन सामने कुठे खेळवले जाणार, पाहा..

आयपीएलचे नवीन वेळापत्रक आता जाहीर झाले आहे. मुंबईचे आता दोन सामने बाकी आहेत. मुंबईचे हे दोन सामने नेमके कधी आणि कुठे खेळवले जाणार आहेत, जाणून घ्या..नवी दिल्ली: आयपीएलचे नवीन वेळापत्रक आता जाहीर झाले आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता मुंबई इंडियन्सचे दोन सामने होणार आहेत. पण हे दोन सामने आता कुठे होणार आहेत, हे आता समोर आले. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना जी भिती होती, ती आता असणार नाही. कारण आता नवीन वेळापत्रकामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली आहे.मुंबई इंडियन्स आता दोन सामने बाकी आहेत. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २१ मे या दिवशी दिल्ली कॅपिटल्सबरोबर होणार आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना हा २६ मे या दिवशी राजस्थान रॉयल्स या संघाबरोबर होणार आहे.

मुंबईचे आतापर्यंत १२ सामने झाले आहेत. त्यामुळे त्यांनी जर हे दोन्ही सामने जिंकले तर त्यांना सहजपणे प्ले ऑफमध्ये पोहोचता येऊ शकते. पण आता हे सामने कधी आणि कुठे होणार आहेत, ही माहिती समोर आली आहे.आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा अखेरचा सामना हा राजस्थान रॉयल्सबरोबर होणार आहे. हा जयपूरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. हा सामना मुंबईचा अखेरचा लीग सामना असणार आहे. पण त्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अजून एक सामना होणार आहे. हा सामना २१ मे या दिवशी खेळवण्यात येणार आहे. मुंबईचा हा सामना दिल्लीच्या संघाबरोबर होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानात म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. कारण जेव्हा घरच्या मैदानात सामना होत असतो तेव्हा त्यांना प्रेक्षकांचा चांगलाच पाठिंबा मिळत असतो, त्याचबरोबर खेळपट्टी आणि मैदान त्यांच्यासाठी नवीन नसते.

त्यामुळे घरच्या मैदानात खेळताना कोणत्याही संघाला फायदा होत असतो. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांसाठी आता ही एक आनंदाची बातमी असणार आहे.मुंबईचे दोन सामने आता बाकी आहेत. या दोनपैकी आता मुंबईने एक सामना जिंकला तर त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता येऊ शकते, असे अधिकृत सांगता येणार नाही. पण मुंबईने जर दोन्ही सामने जिंकले तर त्यांना थेट प्ले ऑफमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईचा जो सामना घरच्या मैदानात होणार आहे, तो सर्वात महत्वाचा ठरणार आहे. या सामन्याचत मुंबईच्या संघाने जर मोठा विजय मिळवला तर त्यांना प्ले ऑफच्या दिशेने ठोस पाऊल टाकता येणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.