आधी लगीन कोंढाण्याचं… भावाचं लग्न सोडून जवान निघाला, मायबाप गहिवरले, गावाने सत्कार करुन ‘वाघा’ला सीमेवर पाठवलं.

जवान चिराग सिसोदिया यांना फोन आला. त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर भावाचे लग्न सोडून ते देश सेवेसाठी तात्काळ सीमेवर रवाना झाले.भावाच्या लग्नासाठी भारतीय वायुसेनेत लीडिंग एअरक्राफ्ट मॅनवर कार्यरत असलेला जवान पंधरा दिवसांची सुट्टी काढून गावी आला. मात्र भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे तात्काळ भारतीय वायू सेनेकडून पाचारण करण्यात आले. जवान ‘आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ या उक्तीप्रमाणे कर्तव्याला प्राधान्य देत भावाचे लग्न सोडून जम्मू येथील एअर बेसवर जाण्यासाठी रवाना झाला. यावेळी आई वडील व भाऊ यांना अश्रू अनावर झाले.नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील खेतिया येथील पोस्ट ऑफिस गल्लीत राहणारा चिराग अजबसिंह सिसोदिया हा भारतीय वायू सेनेत लीडिंग एयरक्राफ्ट मेनवर कार्यरत आहे. त्याचा मोठा भाऊ केशव सिसोदिया याचे 20 मे रोजी लग्न होते.

त्यासाठी चिराग सिसोदिया या जवानाने पंधरा दिवसांची सुट्टी काढून खेतिया येथे सहा मे रोजी आला होता.काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे सर्व जवानांसह सैन्यातील अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतचा फोन जवान चिराग सिसोदिया यांना आला. त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर भावाचे लग्न सोडून आठ मे रोजी देश सेवेसाठी तात्काळ सीमेवर रवाना झाले.ते जम्मू येथे पोहचल्यानंतर त्यांना लगेच एयर बेससाठी रुजू व्हायचे आहे.

घरात लग्नाची तयारी सुरू असताना. ‘आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ तानाजी मालुसरे यांच्या कृती प्रमाणे जवान भावाचे लग्न सोडून देश सेवेसाठी रवाना झाले. यावेळी आई-वडील व भाऊ यांचे अश्रू अनावर झाले.भारतीय वायू सेनेते लीडिंग एयरक्राफ्ट मेनवर कार्यरत खेतिया येथील जवान चिराग सिसोदिया हा जवान भावाचे लग्न सोडून देश सेवेसाठी रवाना झाला. त्याचे सुंदरकांड मित्र मंडळ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नगरवासियांतर्फे जवानाला सत्कार करून ‘भारत माता की जय’ असा जयघोष करीत जवानाला रवाना केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.