साईंचं दर्शन अधुरं; सात जणांच्या कुटुंबाला भीषण अपघात, पती-पत्नीचा एकत्र अंत, चिमुकलीसह पाचजण जखमी.

जालन्यात एकाल कुटुंबाच्या गाडीला भीषण अपघात झाला. हे कुटुंब शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला निघालं होतं. या घटनेत पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.जालन्यात एक भीषण अपघात घडला आहे. सोमवारी (12 मे) मध्यरात्री हृदय पिळून टाकणारी घटना घडली आहे. हैदराबाद येथून शिर्डीकडे जाणाऱ्या खासगी कारला मुरमाने भरलेल्या हायवाने जोराची धडक दिली. यामध्ये पती-पत्नी जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर पाच जण जखमी झाले आहेत.हैद्राबाद येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या कारने उभ्या विरुद्ध दिशेने मुरुमाने भरलेल्या हायवाला जोराची धडक बसली. या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री 11:30 च्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाटा येथे घडली.हा अपघात एवढा भीषण होता की, जेसीबीच्या सहाय्याने गाडी तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

हैदराबादहून शिर्डी देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने घात केला. त्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे. या अपघातात जी रामू (वय 45), जी माधुरी (वय 40, दोघेही रा. हैद्राबाद) जागीच मृत्यू झाला आहे. श्रीवाणी (41), अनुषा (17), मेघना (12), ऋषिका (07), नागेश्वर राव (45) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.हैदराबाद येथील कुटुंब शिर्डी येथे दर्शन करण्यासाठी किया कॅरेन्स गाडी क्रमांक टी जी 08 क्यू 0558 हैदराबाद हून 7 जण कारने रविवारी दुपारी 12 वाजता निघाले होते.

शिर्डीकडे जाण्यासाठी प्रवास करत असताना धुळे सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ क्राॅसिंगपाईंटवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या विना नंबचा हयावा वळण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबला असताना समोरच्या कारची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत परप्रांतीय दांपत्य जागीच ठार झाले, असून कारमधील इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी येऊन मदत कार्य सुरू केले. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील मृतदेह व जखमींना जेसीबीद्वारे बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती कळतच घटनास्थळी महामार्ग 52 ची 103 रुग्णवाहिका व मदतनीस यांनी येऊन मृतदेह व जखमींना बाहेर काढले. जखमी झालेल्याना रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातामुळे परप्रांतीय कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर हायवा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.