जिल्हा कृषी अधीक्षक यांना नांगर देऊन मनसेने दिले निवेदन.

जिल्हा कृषी अधीक्षक यांना नांगर देऊन मनसेने दिले निवेदन. जळगाव जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावीजळगाव : आम्ही आपणास या निवेदनाव्दारे कळवू इच्छीतो की, जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात गारपीट व वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असून काही पंचनामे झाले काही भागात अजून पंचनामे बाकी आहेत ते पंचनामे त्वरित करावे. मका, ज्वारी, इत्यादि कडधान्याचे मोठे नुकसान झाले आहे केळी, पपई, व इतर फळपिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. तसेच जळगाव जिल्हा हा केळी पिकासाठी ओळखला जातो आणि त्याच पिकाचे मोठे नुकसान झाले त्या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

केळी हे पीक वर्षभराचे असते रोप घेण्यापासून आणि लागवडी पासून खर्च सुरू होतो. ८/९ महीने त्यावर केलेला खर्च या गारपीट व वादळी पावसामुळे पुर्णपणे वाया गेला आहे. त्या वेदना सहन होण्यासारख्या नाहीत परंतु शेतकऱ्यांचे पिकाचे उत्पन्न बघून भरीव मदत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळावी हिच अपेक्षा आहे.शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे कारण एकीकडे रब्बी हंगामासाठी शेती मशागतीचे कामे सुरू आहेत आणि दुसरीकडे गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसामुळे असलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक अडचण झाली आहे.खरीप हंगामात चांगले उत्पादन घेता येईल या आशेवर असलेला शेतकरी मात्र परत अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडला आहे. आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. या पावसामुळेगेल्या वर्षात रब्बी हंगाम अतिपावसामुळे उत्पन्न कमी आले होते आणि आता खरीप हंगामात सुद्धा शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान झाले त्यामुळे आर्थिक संकट मोठे आहे. त्यामुळे यावर्षी बियाणे ५० टक्के सबसिडीवर मिळावे.सततच्या कोणत्या न कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे यावेळेस शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळायलाच हवी शासनाने दिलेलं आश्वासन पूर्ण करावे आपनास आम्ही पुनश्च विनंती करतो की रब्बी हंगाम तोंडावर आहे शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी. जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे अविनाश पाटील जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना राजेंद्र निकम जिल्हा संघटक जनहित कक्ष उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे ललित शर्मा संदिप मांडोळे प्रदिप पाटील तालुका अध्यक्ष पवन सपकाळे राहुल चव्हाण विकास पाथरे उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.