राज ठाकरेंचे ‘मिशन महापालिका’; १५ मेपासून दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार, कसा असेल दौरा.

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. १५ व १६ मे रोजी ते नाशिकमध्ये तळ ठोकणार असून, ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. १५ व १६ मे रोजी ते नाशिकमध्ये तळ ठोकणार असून, ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू असताना राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला राहिला असून नाशिककरांनी तीन आमदार आणि महापालिकेतील सत्ता मनसेकडे सोपवली होती.

परंतु, स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद आणि गटबाजीमुळे पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला. स्थानिक गटबाजीमुळे राज ठाकरेंनी नाशिकला ‘साइडिंग’ला टाकले होते. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवले होते. परंतु, मनसेचे ‘पानिपत’ झाले होते. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी, प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी विविध आंदोलने करून पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सक्रिय झाले असून, त्याची सुरुवात नाशिकमधून करणार आहेत. गुरुवार व शुक्रवार ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटन बळकट करण्यावर भर देणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकमेकांना टाळी देण्यासंदर्भातील वक्तव्ये केली होती. त्यामुळे काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून ठाकरे बंधूच्या एकत्रीकरणाचे स्वागत केले आहे. तसेच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र यावेत, अशी कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. विशेष म्हणजे दोन्ही बंधूनी एकत्र यावे, यासाठी नाशिकमध्ये बॅनरबाजीही झाली आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास नाशिकमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या विषयावर राज यांच्याकडून भाष्य होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या नाशिक दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.