ट्रकची कारला धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू, गाडीच्या छपराचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले, बुलढाणा हादरलं.

बुलढाणा येथे कारचा भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे जवळपास चार ते पाच वाजेच्या दरम्यान ट्रक आणि कारमध्ये झालेल्या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर चार जण गंभीर झाले आहे. अत्यंत भीषण अशा अपघातामधील जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचाराकरता भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती देखील गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातामध्ये कारचा अक्षरचा चेंदामेंदा झाला आहे, समोरचा भागाचा चुराडा झाला आहे. हा राष्ट्रीय मार्ग नेहमी धोकादायक मानला जातो. इथे अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. धोकादायक वळणे याबाबत वेळोवेळी सूचना फलक देखील दिले आहे. तरी देखील या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र नेहमीच घडत असतात. ज्या प्रकारे हा अपघात झाला त्यानंतर मृतांना अक्षरशा गाडीच्या छपराचा पत्रा कापून बाहेर काढण्यात आलं.

जीवन रक्षक व परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतांना बाहेर काढण्यात आले.अपघातातील मृतांची व जखमींची नावे अद्याप समोर आली नसली तरी हा सुसाट वेग अनियंत्रिक वाहन चालवण्याचा रॅश ड्रायविंगचा प्रकार म्हटला जाऊ शकतो. ज्या प्रकारे घटनास्थळावर हा प्रकार घडला त्यावरून राष्ट्रीय महामार्गावरून पुन्हा एकदा वाहन सुसाट वेगाने व अपघात संकेत होत असलेली वाढ ही समोर येत आहे.जिल्ह्यात एकापाठोपाठ एक अपघात घडत असताना काल चिखलीवरून तेल्हारा येथे आपल्या दुचाकी वरून घरी परतणाऱ्या शिवशंकर भोपळे (वय वर्ष 38 हनवतखेड) याचा बोरगाव वसू फाटा चिखली खामगाव रस्त्यावर झालेल्या एसटी बस मोटर सायकल अपघातात मृत्यू झाला.

शिवशंकर प्रल्हाद भोपळे हे एच एच २१ बी एन 47 34 एचएफ डीलक्स या दुचाकीवरून चिखलीवरून आपल्या गावी तेल्हाराकडे जात होते. दरम्यान, सोमठाणा ते बोरगाव वसू फाटा दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून वेगात आलेल्या एसटी बस क्रमांक एम एच ०६ ए एस 87 86 ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे भोपळे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. आजूबाजूला नागरिकांनी तात्काळ मदत केली. मात्र, तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यासंदर्भात फिर्यादी आनंद अर्जुन कुटे राहणार तेलारा यांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राजू सुसर करीत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.