ताई सुट्टीत माहेरी, भाच्यांना आईस्क्रिम दिलं, फोटोग्राफर मामा घराबाहेर पडला अन् घात झाला.

 पाच वर्षांपूर्वी सोहमच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर सोहम गेवराई चौक परिसरामध्ये असलेल्या फोटो स्टुडिओमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करत होता.सुट्ट्यांमध्ये माहेरी आलेल्या बहीण आणि भाच्यांना आईस्क्रिम आणून दिलं. त्यांच्यासोबत हसत खेळत गप्पा मारल्या. काही वेळाने फोटोग्राफीचे काम आहे असं सांगून घराबाहेर पडला. मात्र २५ वर्षीय फोटोग्राफर सोहम उगले याने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.कठीण परिस्थितीवर मात करत सर्व काही सुरळीत झाले असताना अचानक सोहम उगले याने टोकाचं पाऊल का उचललं? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेने छत्रपती संभाजीनगर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.सोहम नानासाहेब उगले (वय 25, रा. देवळाई चौक परिसर) असे आत्महत्या केलेल्या फोटोग्राफरचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम हा देवळाई परिसरामध्ये कुटुंबीयांसोबत राहत होता. पाच वर्षांपूर्वी सोहमच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर सोहम गेवराई चौक परिसरामध्ये असलेल्या फोटो स्टुडिओमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करत होता.वडील गेल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी सोहमच्या खांद्यावर आली. जबाबदारीचे भान राखून सोहम इमानदारीने काम करत होता. दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने सोहमची बहीण मुलांना घेऊन माहेरी आली होती. सोमवार दि. 11 मे रोजी दुपारी सोहमने बहीण व भाच्यांना आईस्क्रीम आणून दिली.

बहिण व भाच्यांसोबत हसत खेळत गप्पा मारल्या. सायंकाळच्या सुमारास फोटोग्राफीचे काम आहे, असं सांगून सोहम घराबाहेर पडला. रात्री तो घरी परतलाच नाही.सकाळी आठ वाजेच्या सुमारास हर्सूल तलावामध्ये अनोळखी मृतदेह आढळून आला. अग्निशामक विभागाच्या आर आर सोनवणे, विक्रम, समीर यांच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला. तातडीने मृतदेह घाटी रुग्णाला दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ओळख पटवली असता हा मृतदेह सोहम याचा असल्याचा निष्पन्न झालं.या प्रकरणी कुटुंबीयांना माहिती दिली असता घाटे रुग्णालयामध्ये कुटुंबीयांनी टाहो फोडला. दरम्यान सोहमने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकले नाही या प्रकरणी हर्सूल पोलीस पुढील तपास करीत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.