‘तो गोव्याच्या बीचवर आहे’; महाराष्ट्रातील फरार कुख्यात गुंडासाठी खबऱ्याचा फोन,पोलीस बीचवर पोहोचले अन्…

 नंदुरबार पोलिसांनी गोव्यात मोठी कारवाई केली. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. नागेश उर्फ नाकक्षा पाडवी असे आरोपीचे नाव आहे. तो चोरी, हाणामारी अशा गुन्ह्यांमध्ये सामील होता. त्याच्यावर नंदुरबार जिल्ह्यात आठ गुन्हे दाखल आहेत. इतर राज्यांमध्येही त्याचे गुन्हे आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या टीमने ही कामगिरी केली. ‘कानून के हाथ लंबे होते है’ ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल, पण याची प्रचिती थेट गोव्याच्या बिचवर पाहायला मिळाली. अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकरणांंमध्ये आरोपी असलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी गोव्याच्या बीचवर अटक केली आहे. बाहेरील राज्यांमध्येही गुन्गे दाखल असलेल्या आरोच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली अन् पोलीस मागावर निघाले. या कारवाईमध्ये पोलिसांना मिळालेली खबर खरी निघाल्याने कारवाी करणं सोप्पे झाले. नंदुरबार जिल्ह्यात चोरी, हाणामारी तसेच मालमत्तेविरुद्ध 8 गुन्हे तसेच इतर राज्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत. असा सराईत गुन्हेगार अनेक दिवसांपासून फरार होता.

पोलिसांना खबर मिळाली की तो गोवा येथे सराईत फरार आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोवा येथे रवाना झाले.अनेक बीज पालथे घातल्यानंतर अखेर कलंगुड बीचवरून त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, नागेश ऊर्फ नाकक्षा दमण्या पाडवी, रा. कात्री, ता. धडगाव हा आरोपी गोवा येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार, पाटील यांनी तात्काळ एक पथक गोव्याला रवाना केले. गोवा पोलिसांच्या मदतीने या पथकाने गोव्यात गोव्यातील अनेक बीज पालठे घातली. अखेर कळंगुट बीचवरून नागेश उर्फ नाकक्षा पाडवी याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याचे खरे नाव राज्या ऊर्फ नाकक्षा ऊर्फ नागेश दमण्या पाडवी (वय २७ वर्षे) रा.कात्री ता.धडगाव असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध नंदुरबार जिल्ह्यात चोरी हाणामारी आणि मालमत्तेसंबंधी एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, राज्याबाहेरही त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत, असे तपासात समोर आले आहे.पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि. मुकेश पवार, पोहेकॉ सजन वाघ, मनोज नाईक, रमेश साळुंखे, पोना मोहन ढमढेरे आणि पो.शि. यशोदिप ओगले यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.