मी पोलीस आहे! तुला आता सोडत नाही; पोलीस दाम्पत्याने एसटी चालकाला बुकललं, नेमकं काय घडलं.

एसटी चालकाने आपल्याला अडवले कसे? शिवाय हा उलट आम्हाला का प्रश्न विचारतो? यामुळे राग पोलिस दांपत्याला राग अनावर झाला. त्यांनी गाडीच्या बाहेर येत एसटीचालकाची कॉलर धरली आणि त्याला दमदाटीही केली. कार ‘चालकाने मी पोलीस आहे. तुला आता सोडत नाही’ अशी धमकी देत मारहाण केली.एस.टी. बसला ओव्हरटेक करण्यास संधी न दिल्याने एस टी चालक आणि पोलिस दांपत्यात वाद झाल्याची घटना कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील नावली येथे घडली आहे. संतापलेल्या दांपत्याने एसटी चालकाला मारहाण केली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरमधील पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ पासून निघालेल्या एसटी बसला एक कार ओव्हरटेक करण्यासाठी जागा देत नव्हती. एसटी चालकाने बऱ्याचदा हॉर्न देऊन पण कारचालक बसला पुढे जाण्यासाठी जागा देत नव्हती. नावली पर्यंत हा प्रकार सुरू होता. नावलीच्या पुढे कार ला ओव्हरटेक करत बस चालकाने कार चालकाला थांबवले.

आणि बसमधून उतरुन घडल्या प्रकाराबद्दल विचारणा केली.सदर कार ही पोलिस दांपत्याची होती. एसटी चालकाने आपल्याला अडवले कसे? शिवाय हा उलट आम्हाला का प्रश्न विचारतो? यामुळे राग पोलिस दांपत्याला राग अनावर झाला. त्यांनी गाडीच्या बाहेर येत एसटीचालकाची कॉलर धरली आणि त्याला दमदाटीही केली. कार ‘चालकाने मी पोलीस आहे. तुला आता सोडत नाही’ अशी धमकी देत मारहाण केली. या प्रकरणी पोलिस दांपत्य आसिफ कलायगार आणि त्यांची पत्नी हाफिबा आसिफ कलायगार यांच्याविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीचा आणि पोलिस दांपत्याच्या अरेरावीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दुसरीकडे, सोलापूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईला मिळणारी पेन्शन ती मावशी, मामा यांना देत होती. या रागातून पोटच्या मुलानेच आईच्या डोक्यात कुकरने जोरात मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जागा मालकाच्या फिर्यादीवरून मुलाविरूद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हर्षल रामकृष्ण चिंचणसुरे (रा. भारत नगर, कुमठा नाका) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. संशयित आरोपी हर्षल चिंचणसुरे हा शिक्षण विभागात लिपिक पदावर नोकरीस आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.