का रे जीवावर उठलास माझ्या?; नऊ महिने ज्याला पोटात सांभाळला, त्यानेच आईच्या डोक्यात कुकर घातला.

पोलिसांनी अधिक तपास केला असता मुलानेच आईला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली. त्यानुसार जखमी विजयालक्ष्मी चिंचणसुरे या ज्याठिकाणी राहायला आहेत, त्या इमारतीचे मालक अमित सुरेश धुपद (रा. सोमवार पेठ) यांनी दिली आहे.मुलाला नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवून पुढे शिक्षण देऊन नोकरीलायक ज्या आईने बनविले, त्याच आईला काही रुपयांसाठी पोटच्या मुलानेच ठार मारण्याचा प्रयत्न केला. आईला मिळणारी पेन्शन ती मावशी, मामा यांना देत होती. या रागातून पोटच्या मुलानेच आईच्या डोक्यात कुकरने जोरात मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जागा मालकाच्या फिर्यादीवरून मुलाविरूद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हर्षल रामकृष्ण चिंचणसुरे (रा. भारत नगर, कुमठा नाका) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. संशयित आरोपी हर्षल चिंचणसुरे हा शिक्षण विभागात लिपिक पदावर नोकरीस आहे.हर्षलने बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे बिंग फुटले.

९ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने पेन्शनच्या कारणातून आईसोबत भांडण केले. पेन्शनची रक्कम आई नातेवाइकांनाच देत असल्याच्या रागातून त्याने घरातील कुकर आईच्या डोक्यात घातला. त्यात आई जागेवरच बेशुद्ध पडली. त्यानंतर त्याने मित्राला बोलावून घेतले. विजयालक्ष्मी रामकृष्ण चिंचणसुरे (वय ६३) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसांनी यासंदर्भात रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी नातेवाईक कोणीच नव्हते. पोलिसांनी अधिक तपास केला असता मुलानेच आईला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली. त्यानुसार जखमी विजयालक्ष्मी चिंचणसुरे या ज्याठिकाणी राहायला आहेत, त्या इमारतीचे मालक अमित सुरेश धुपद (रा. सोमवार पेठ) यांनी दिली आहे.

हर्षल वर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी हर्षल याला अटक केली. आपण आईला सांभाळतो, तरीदेखील ती पेन्शनची रक्कम नातेवाइकांना देत असल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले. हर्षल हा वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात लिपिक म्हणून नोकरीला लागला आहे. तरी देखील आईला मिळणाऱ्या पेंशनवर त्याची नजर होती. हर्षलवर गुन्हा दाखल झाल्याने नोकरीवर गंडांतर येऊ शकते. सध्या हर्षल चिंचणसुरे पोलिस कोठडीत आहे. त्यासंदर्भातील अहवाल पोलिस शिक्षण विभागाला पाठविणार आहेत. सहायक पोलिस निरीक्षक ज्योत्सना भांबिष्टे अधिक तपास तपास करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.