४० लाखांहून अधिक प्रवासी मध्य रेल्वेवर, पण १२ वर्षांत अवघ्या सहा फेऱ्या वाढल्याची धक्कादायक बाब, मध्य रेल्वेने सांगितलं कारण.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या सीएसएमटी-कल्याण मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची वाढ अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. गेल्या १२ वर्षात केवळ सहा फेऱ्या वाढल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कल्याण-कसारा आणि कर्जत दरम्यान सुविधा नसल्याने अडचणी येत असून, सीएसएमटी-कल्याण मार्गावर अधिक फेऱ्यांची मागणी जोर धरत आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण हा मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेतील सर्वाधिक गर्दीचा रेल्वेमार्ग. लोकल प्रवासी गर्दी विभागण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या या मार्गावर सुरू करण्यात आल्या. मात्र, गेल्या १२ वर्षांत १५ डब्यांच्या अवघ्या सहा फेऱ्या वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मुंबई उपनगरी रेल्वे अर्थात मुंबई लोकलमधून रोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यातील अंदाजे ४० लाखांहून अधिक प्रवासी मध्य रेल्वेवर आहेत. उर्वरित प्रवासी पश्चिम रेल्वेचा वापर करतात. प्रवासी गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने लोकलची क्षमता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग केले. त्यातील एक म्हणजे १५ डबा लोकल. बारा डबा लोकलच्या तुलनेत पंधरा डबा लोकलमध्ये प्रवासी क्षमता सुमारे १३ टक्क्यांनी वाढते.मध्य रेल्वेने २०१२-१३ मध्ये सीएसएमटी ते कल्याण दरम्यान १५ डबा लोकल सुरू केली.

प्रारंभी या लोकलच्या १६ फेऱ्या होत्या. प्रचंड प्रतिसादामुळे, प्रवासी आणि लोकप्रतिनिधींनी १५ डबा लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी सुरू केली. यामुळे सहा फेऱ्यांची वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. सन २०१९-२० मध्ये १५ डबा लोकल फेऱ्यांची संख्या २२ वर पोहोचली. सद्यस्थितीत पंधरा डबा लोकलच्या अवघ्या २२ फेऱ्या चालवल्या जात आहेत.१५ डबा लोकलला प्रतिसाद वाढल्याने कल्याण ते कसारा आणि कर्जतदरम्यान लोकल फेऱ्या सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाकडे पाठवला. मुंबई लोकलची क्षमता वाढवणारा हा प्रस्ताव रेल्वे मंडळाने मंजूर केला आणि काम सुरू करण्याच्या सूचना मध्य रेल्वेला दिल्या. मात्र, वाढीव फेऱ्या चालवण्यासाठी कल्याण ते कसारा आणि कर्जत या दरम्यान पुरेशी जागा नसल्याने याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे.कल्याण ते कर्जत कसारादरम्यान फलाट नसल्याचे मध्य रेल्वेकडून कारण गर्दी विभागण्याच्या प्रयत्नांवर रेल्वेकडून पाणी सध्या केवळ २२ फेऱ्या होत असल्याचे वास्तवसीएसएमटी ते कल्याणदरम्यान वाढीव डब्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा आहेत.

मध्य रेल्वेने १५ डबा लोकल उपलब्ध करून या मार्गावर फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी कोणत्याही हालचाली रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नाहीत, अशी खंत या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी अंकित साठे यांनी व्यक्त केली आहे.सकाळी ८.३३ ची कल्याणहून सुटणारी १५ डब्यांची लोकल कल्याणमध्येच पूर्ण भरते. डोंबिवलीत चढणाऱ्या प्रवाशांना धक्काबुक्की करूनच या लोकलमध्ये प्रवेश करावा लागतो. कल्याण ते कर्जत, कसारा मार्गावर वाढीव डब्यांच्या फेऱ्यांची गरज असली, तरी फलाटांची लांबी वाढवण्यात अनेक अडचणी आहेत. यामुळे सर्वप्रथम सीएसएमटी ते कल्याणदरम्यान फेऱ्यांची संख्या वाढवावी, असं मत प्रवासी मधुरा भावे यांनी व्यक्त केलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.