गोलाणी मार्केटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ : मोबाईलचे दुकान फोडले !

मध्यरात्रीच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील मोबाईलचे दुकान फोडून रिपेअरिंगसाठी आलेले ५० हजार १०० रुपयांचे पाच मोबाईल चोरुन नेले. त्यानंतर चोरट्यांनी याच मार्केटमधील कुशल इंटरप्राईजेस व रियल मी सर्व्हिस सेंटर हे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मनूमाता नगरात अजयसिंग नागेंद्र राजपूत (वय ३९) हे वास्तव्यास असून त्यांचे गोलाणी मार्केटमध्ये ग्राऊंड फ्लोअरला पुजा मोबाईल नावाने मोबाईल विक्रीचे दुकान आहे. रविवारी रात्री ते दुकानबंद करुन घरी गेले. त्यानंतर सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये फिरणाऱ्या ललित गोरखा याने फोन करुन दुकानचे कुलूप तोडल्याची माहिती दिली. त्यानुसार अजयसिंग राजपूत हे तात्काळ दुकानावर गेले. त्यांनी दुकानात जावून पाहणी केली असता, चोरट्याने त्यांच्या दुकानातून रिपेअरिंगसाठी आलेले पाच मोबाईल आणि शंभर रुपये चोरुन नेले.

चोरट्याने अजयसिंग राजपूत यांच्या दुकानात चोरी करण्यापुर्वी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. तसेच दुकानात लावलेले वायफाय देखील तोडून नुकसान केले आहे. चोरीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुकानाच्या परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल असून त्यांच्याकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.