रिक्षा थांबली अन मागे येणारी वाहने देखील एकमेकांवर आदळली !

अचानक थांबलेल्या रिक्षामुळे त्याच्या मागे येत असलेले वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातात रिक्षातील प्रवासी महिला खैरुननाज इरफान भिस्ती (वय २४, रा. भिस्ती मोहल्ला, शाहूनगर) या जखमी झाल्या. ही घटना दि. ११ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हॉटेल टुरिस्ट समोर घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील निमखेडी शिवारातील हिराशिवा कॉलनीत शिवाजी युवराज पाटील हे अभियंता वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे (एमएच ०५, डीई ००६८) क्रमांकाची कार आहे. दि. ११ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नेहरु चौकातून घरी जात होते. यावेळी सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे होते, त्यामुळे एक प्रवासी रिक्षा अचानक थांबल्यामुळे कारचालक देखील थांबले.

त्यामुळे मागून भरधाव वेगाने येणारी (एमएच १९, डीव्ही ६८८६) क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी पाटील यांची कार समोर असलेल्या रिक्षावर जावून आदळली. या अपघातात रिक्षातील खैरुननाज भिस्ती ही महिला गंभीर जखमी झाली. त्यांना तात्काळ उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, शिवाजी पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार धडक देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ ललित बागुल करीत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.