माधुरी आणि विकास कोकणे यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, विकास याचे अर्चना अहिरे हिच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असे. अर्चना हिच्या सांगण्यावरून विकासने पत्नीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार सुरूच ठेवले होते. पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाल्याची आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पती आणि त्याच्या प्रेयसीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. ही घटना १० मे रोजी दुपारी घडली.मृत महिलेचे नाव माधुरी विकास कोकणे (वय ३४, रा. १७/१ अष्टविनायक नगर, आंबेगाव पठार) असे आहे.










