सांगली हादरलं! चित्रपटापेक्षा भयंकर; सांगलीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार मुबारकला संपवलं.

 सांगलीतील संजयनगरमध्ये मंगळवार बाजार परिसरात एका मशिदीजवळ सहा जणांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार मुबारक शहा याचा धारदार शस्त्रांनी आणि दगडाने निर्घृण खून केला. दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.शहरातील संजयनगर परिसरात असलेल्या मंगळवार बाजार परिसरातील एका मस्जिद जवळ सहा जणांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने डोक्यात आणि हातावर वार करत तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. सदर खुनाची घटना ही सोमवार दि. १२ मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. मुबारक हसीउल्ला शहा (वय ४४ रा. अहिल्यानगर कुपवाड) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.यांच्यासह संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. दरम्यान, या खुनाचे कारण अस्पष्ट असून याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत मुबारक शहा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो आपल्या कुटुंबियांसह कुपवाड परिसरातील अहिल्यानगर येथे राहत होता. मुबारक शहा हा आज सोमवारी दुपारी मंगळवार बाजार चौकामध्ये त्याच्या मित्रांसोबत बोलत बसला होता. यावेळी संशयित सहा जण त्याठिकाणी आले. संशयित आणि शहा यांच्यात वाद झाला. वाद टोकाला गेल्याने संशयितांनी शहा याला मारहाण करत धारदार शस्त्राने वार केले. शहा हा त्यांच्या तावडीतून सुटून सह्याद्रीनगरकडे धावू लागला. यावेळी संशयित सहा जणांनी त्याचा दुचाकीवरून पाठलाग करत एका मस्जिद समोर त्याला गाठले. याठिकाणी पुन्हा त्याच्यावर वार केले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात शहा रस्त्यावर कोसळला. यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा निर्घृण खून करत संशयित घटनास्थळावरून पसार झाले. भरदिवसा घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहर विभागाच्या उपअधीक्षका विमला एम, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक स्वामी यांनी पथकांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी फॉरेन्सिक टीम, श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्या आधारे संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके तातडीने रवाना करण्यात आली. दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला आहे याचा पोलीस आता शोध घेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.