‘मुसळधार’ ठरला काळ! नाशिक जिल्ह्यात पावसाचे चार बळी, २१ मिलिमीटरची नोंद, आजही यलो अलर्ट.

भरदुपारी कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडून सलग दुसऱ्या दिवशी शहरासह उपनगरांतील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, अवकाळीचे हे संकट अजून दोन दिवस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सोमवारी चार जणांचा बळी घेतला. शहरात पडून दोन दुचाकीस्वार तरुण, तर सुरगाण्यात विजेचा शॉक लागून एकजण ठार झाला. इगतपुरीत वीज अंगावर पडून तरुणीचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात पाच जनावरेही दगावली.झाड अंगावर सातपूर परिसरात सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास दुचाकीवर झाड कोसळल्याने गौरव भास्कर रिपोटे (वय २१, रा. गुलाबवाडी, नाशिकरोड) आणि पाठीमागे बसलेला त्याचा मित्र सम्यक नीलेश भोसले (१९) हे दोघे ठार झाले. सुरगाणा तालुक्यातील खडकी दिगर येथे विजेचा शॉक लागून देवीदास सीताराम भोये यांचा मृत्यू झाला. इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथील पूजा त्र्यंबक भांगरे (वय २३) हिचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत पाच जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने रविवारी शहराला झोडपल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारीदेखील शहराला वादळी तडाखा बसला. जोरदार वाऱ्यासह बसरलेल्या मुसळधारेमुळे शहरभरात ठिकठिकाणी झाडे, फांद्या कोसळून दोन दुचाकीस्वार ठार होण्यासह असंख्य वाहने, आस्थापनांचे नुकसान झाले. सातपूर पोलिस ठाण्याकडून महिंद्रा सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धावत्या दुचाकीवर अचानक गुलमोहोराचे झाड कोसळल्याने दुचाकीस्वार गौरव आणि सम्यक ठार झाले. ते दोघेही सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये एका कंपनीत कामाला होते. नियमितपणे सोमवारी कंपनीतून ते घराकडे जाण्यासाठी निघाले. पण, दुर्दैवाने नेहमीच्या रस्त्यावर ‘काळ’ आडवा आला. दरम्यान, सन २०२२ मध्ये गुलमोहोराचे वृक्ष कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. सातपूर-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आयटीआय सिग्नलजवळ गुलमोहोराची अनेक झाडे आहेत. ही झाडे एका बाजूला झुकली असून, सर्व झाडांचे खोड ठिसूळ झालेले आहे.

सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गौरव आणि सम्यक या झाडांखालून जात होते. त्यावेळी गुलमोहोराच्या झाडाचे खोड मुळासकट दुचाकीवर कोसळले. त्याखाली दोघेही दबले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणेसह पोलिस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांनी धोकादायक वृक्षासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, शहरात दिवसभरात २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, दिवसभरात दोनशेपेक्षा जास्त झाडांच्या फांद्या, तर पन्नासहून अधिक धोकादायक वृक्ष उन्मळून पडले. भरदुपारी कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडून सलग दुसऱ्या दिवशी शहरासह उपनगरांतील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, अवकाळीचे हे संकट अजून दोन दिवस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आज, मंगळवारीदेखील ‘यलो अलर्ट’ असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नाशिकरोड : गौरव आणि सम्यक या दोन जीवलग मित्रांच्या बुद्धपौर्णिमेच्या दिवशीच झालेल्या मृत्यूने मालधक्का येथे शोककळा पसरली होती. गौरवच्या मागे आईवडील व विवाहित बहीण आहे. सम्यकच्या मागे आईवडील आहेत. दोघांच्या मृत्यूने त्यांच्या आई-वडिलांची म्हतारपणाची काठीच हिरावली गेली आहे. दोघांचे वडील रेल्वे मालधक्का येथे हमाली काम करातात, तर आई धुणीभांडीची कामे करतात. त्यामुळे घर चालविण्यासाठी हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिकलेले हे दोघे चार महिन्यांपासून सातपूरच्या कंपनीत कामास जाऊ लागले होते. प्रवासाचा खर्च वाचावा म्हणून दोघे एकाच दुचाकीवर जात असत. आपत्ती व्यवस्थापन आणि मुख्यमंत्री निधीतून या दोघांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी मालधक्का येथील रहिवाशांनी केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.