आरोपी शाळेत विद्यार्थ्यांना नृत्य शिकविण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण करायचा; तसेच त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर अत्याचार करायचा, असे तक्रारीत नमूद आहे.कर्वेनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाचा जामीन अर्ज विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाने फेटाळला. शाळेतील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी शिक्षक विद्यार्थ्याचा पाठलाग करत त्यांच्या पाठोपाठ स्वच्छतागृहात जाताना दिसत आहे.या प्रकरणात चार पीडित विद्यार्थी असून, आरोपी शिक्षक असतानाही त्याने हा अतिशय गंभीर गुन्हा केला आहे. त्यामुळे आरोपी जामीन मिळण्यास पात्र नाही, असे नमूद करत विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा आदेश दिला.या प्रकरणी 39 वर्षीय नृत्य शिक्षकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 377 (अनैसर्गिक अत्याचार) व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) कायद्याच्या कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत.आरोपी शाळेत विद्यार्थ्यांना नृत्य शिकविण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण करायचा; तसेच त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर अत्याचार करायचा, असे तक्रारीत नमूद आहे.










