जळगाव जिल्हयामध्ये चोरीच्या घटनावाढत असल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , यांनी चोरीच्या घटना उघडकिस आणुन आरोपी अटक करणे बाबत मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे मा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत , पोलीस निरीक्षक संदीप पाटील सो, यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याच्या सुचना केल्या होत्या.एम.आय.डी.सी परीसरातील जगवानीनगरच्या गेटसमोर दुकान नं 04.00 चे शटर उचकावुन चैनल गेटकट करून त्यावाटे आत प्रवेश करुन 1) 65000/-रु किंमती च्या जुने स्क्रैप कॉपर एकुण सहा गोण्या अंदाजे 350 किलो. कि अं.2) 1,20,000/-रु किं चे नविन कॉपरचे अंदाजे 150 किलो वजनाच्या वायरी किअं. असा एकुण 1,85,000/- रु. कि.चा मुददेमाल चोरी झाल्याचे फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी पो.स्टे येथे गु.र.न 302/2025 BNS कलम 305 (अ), 331(3), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.










