देव तारी त्याला कोण मारी, बसचा अचानक फुटला बलून, चालकाचे डोके उडकले, आरडाओरड होताच…

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे मंदिराच्या पार्किंगमध्ये मोठी दुर्घटना टळली. एका बसचा बलून फुटल्याने चालक हौजिंगजवळ अडकला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वर्धा जिल्ह्यातील सुनील देवतडे हे दर्शनासाठी आले होते. औंढा नागनाथ येथील मंदिर पार्किंगमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसचा बलून फुटल्याने हौजिंगजवळ अडकलेल्या चालकाला दोन तासाच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चालकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल दोन तास हा चालक अडकून बसला होता. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिराच्या पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या खाजगी बस खाली असलेल्या बलूनमधून हवा लीक होत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. यादरम्यान चालक पाहणी करत असताना बलून फुटल्याने हौजिंगजवळ त्याचे डोके अडकून पडले. यानंतर चालकाने आरडाओरड सुरू केली. ही बाब पार्किंगमधील इतर चालकांच्या लक्षात आली.वेळ न घालता इतर चालकांनी ही माहिती औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे यांना दिली. माहिती मिळताच जी.एस राहिरे हे त्यांच्यासह ज्ञानेश्वर गोरे आणि इतर मेकॅनिकलला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दोन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर जॅकने बस उचलून चालकास सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही घटना (११) रविवार रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान घडली.सुनील देवतडे राहणार पौतार जिल्हा वर्धा असे चालकाचे नाव आहे. सुनील देवतडे हे भाविकांना घेऊन देवदर्शनासाठी औंढा नागनाथ येथे आले होते. दैव बलवत्तर म्हणून ते बालबाल वाचले. दरम्यान बसखाली चालक अडकल्याचे कळताच पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. यावेळीचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होत आहेत. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत, चालकाला सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांचे काैतुक केले जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.