षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही. मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही, असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका केली.रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही. मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही, असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर यांच्यावर टीका केली. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये मार्डी गटाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली.फलटणचा शकुनी जिंकणार नाही जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांना शकुनी मामाची उपमा दिली. रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही अशी जहरी टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे.










