गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उध्वस्त; सी-60 जवानांच्या मोहिमेला यश, मोठा शस्त्रसाठा जप्त.

गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलाने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता.गडचिरोली: देशात एकीकडे सीमारेषेवर तणाव असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवरुन लष्कर अलर्ट मोडवर आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पहलगाम हल्ल्याचा बदला घेत दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. भारतीय वायुसेनेच्या या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे. एकीकडे भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांच्या तळांना समूळ नष्ट करण्यात येत असताना दुसरीकडे गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील नक्षलवादी (Naxalite) कारवायांवरही सुरक्षा दलाकडून मोहिम राबवली जात आहे. भामराकडजवळ नक्षलवादी कारवायांसाठी उभारण्यात आलेला तळ गडचिरोली पोलिसांनी (Police) उध्वस्त केला आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलाने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता. मात्र, हा तळ उध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले. गोपनीय माहितीच्याआधारे अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे सुमारे 200 जवान विशेष अभियानावर होते. दरम्यान, आज सकाळी जंगल परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी, सी-60 जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. ही चकमक तीन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोन तास चालू होती. चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोधमोहिमेत एक स्वयंचलित इन्सास रायफल,एक सिंगल शॉट रायफल,एक मॅगझीन,अनेक जिवंत काडतुसे,डिटोनेटर,एक रेडिओ, तीन पिट्टु (सामानाची पिशवी), वॉकीटॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू सापडल्या आहेत. गडचिरोलीतील सी-60 जवानांनी नक्षलवाद्यांचा तळ पूर्णतः उद्ध्वस्त केला असून चकमकीत काही नक्षलवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.