मंदिरात जाण्यासाठी निघालेल्या पुजारी महिलेसोबत भयंकर घटना.

नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यात आले. आरोपीने महिलेचे कान कापून सोन्या-चांदीचे दागिने चोरले.नांदेड: एका वृद्ध पुजारी महिलेचा खून करून अंगावरील सोनं गायब केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात घडली आहे. खून केल्यानंतर आरोपीने वृद्ध महिलेचे कान कापून कानातील बाळ्या, हातातील चांदीचे कडे आणि सोन्याची पोत लंपास केली. या प्रकरणी हदगाव पोलिसांनी आरोपी खंडेराव सोळंके याला अटक केली असून त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत सिताबाई रामभाऊ फुले (वय ८४) या हदगाव तालुक्यातील हस्तरा गावातील रहिवासी होत्या. हदगाव शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर हस्तरा हे गाव आहे. या गावाच्या शेजारी खंडोबाचे अत्यंत पुरातन असे मंदिर आहे. हे मंदिर गावापासून २५० मीटर अंतरावर आहे.

या मंदिरातील खंडोबाच्या पुजा व सर्व उपासना विधीचा मान फुले कुटुंबाकडे आहे. यात कुटुंबातील सीताबाई रामभाऊ फुले ही महिला होती. दररोज मंदिरात जाऊन सीताबाई या सेवा करायच्या. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या मंदिराला जाण्यासाठी घरातून निघाल्या, पण उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. आई घरी न आल्याने मुलाने शोध घेतला. पण वृद्ध महिलेचा शोध काही लागला नाही.दरम्यान या महिलेच्या नातवाने ती फुले तोडत असताना सायंकाळी ६ वाजता बघितले होते. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ही महिला घरी आली नसल्यामुळे सर्वांनी महिलेचा गावात व शेतशिवारात सर्वत्र शोध घेतला. परंतु, ही महिला आढळून आली नाही. सकाळीसुद्धा गावकऱ्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु महिला सापडली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी व कुटुंबीयांनी हदगाव पोलीस ठाणे गाठून महिलेचा नातू सागर बंडू फुले यांनी तक्रार दिली.

तपासादरम्यान पोलिसांना वृद्ध महिलेचा मृतदेह मंदिराच्या आणि गावाच्या मध्यंतरी असलेल्या एका ऊसाच्या शेतात आढळून आला.सदर महिलेचे कान तुटलेल्या अवस्थेत आणि अंगावरील दागिने गायब असल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत खंडेराव सोळंके याला ताब्यात घेतले. यावेळी आरोपीने वृद्ध महिलेचा खून केल्याची कबुली दिली. आरोपीने महिलेचा खून केल्यानंतर कान कापले आणि कानातील बाळ्या, हातातील कडे आणि गळ्यातील सोन्याची पोत लंपास केली होती. विशेष म्हणजे आरोपी खंडेराव सोळंके गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.